घरमहाराष्ट्रबारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही - बारामतीकर

बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही – बारामतीकर

Subscribe

'बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही’ अशी प्रतिक्रिया बारामतीकरांनी व्यक्त केली आहे. हा बारामतीकरांनी भाजपला टोला लगावला असल्याची चर्चा संपूर्ण शहरात रंगत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून राजकारणात बारामतीचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे आता भाजपाची नजर बारामतीवर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या भाजपाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी बारामतीत कमळ फुलवणार असल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानावर बारामतीकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही’ अशी बारामतीकरांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

ठिकठिकाणी लावण्यात आले हे पोस्टर

बारामती हे राष्ट्रवादीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगळं स्थान आहे. मात्र आता यावर नजर ठेवणाऱ्या भाजपला बारामतीकरांनी चांगलेच उत्तर दिले आहे. बारामतीकरांनी शहरात ठिकठिकाणी फलक लावले आहेत. या फलकांमध्ये ‘बारामतीत गोडसेचा पुनर्जन्म होणार नाही, कमळ कधीच फुलणार नाही’ असा संदेश लिहिण्यात आले असून त्याखाली बारामतीकर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे पोस्टर नेमकं कोणी लावले आहेत. याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र पोस्टरवरील आशयावरुन हे तरी स्पष्ट झाले आहे की, हे पोस्टर भाजपाला अनुसरुनच लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्या आवाहनाला आणि दाव्यावर हे पोस्टरमधून उत्तर देण्यात आले आहे. तसेच बारामतीत गोडसेचा पुर्नजन्म होणार नाही, असं पोस्टरवर लिहून भाजपाला उत्तर दिलं आहे अशी चर्चा शहरात रंगत आहे.

- Advertisement -

असे म्हणाले होते मुख्यमंत्री आणि अमित शहा

‘यंदा भाजपा राज्यात ४३ जागा जिंकेल आणि ४३ वी जागा ही बारामतीची असेल’, असे भाकित मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्तवले होते. तर, ‘महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा आपल्याला जिंकायच्या आहेत आणि त्यातील एक जागा बारामतीचीही हवी’, असं अमित शाह म्हणाले होते.


वाचा – लोकसभेत जाण्यामागे शरद पवारांचा हा असू शकतो हेतू?

- Advertisement -

वाचा – दोन अंकी खासदार नसलेल्यांना पंतप्रधान बनायचेय; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -