घरमहाराष्ट्रजळगावात कमळ फुललं! शिवसेनेचे सुरेश जैन यांना धक्का!!

जळगावात कमळ फुललं! शिवसेनेचे सुरेश जैन यांना धक्का!!

Subscribe

जळगाव महापालिकेमध्ये भाजपने ४६ जागी विजय मिळवत सुरेश जैन यांना धक्का दिला आहे. त्यामुळे आता गिरीश महाजन यांच्या राजकीय ताकदीमध्ये वाढ झाली आहे.

जळगाव महापालिकेमध्ये अखेर कमल फुलले आहे. जळगावातीवल महापालिका निवडणुकामध्ये भाजपने जबरदस्त कामगिरी करत ४६ जागी विजय मिळवला आहे. जळगाव महापालिकेतील ५७ जागांपैकी  ४६ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. मागील ४० वर्षापासून शिवसेनेचे सुरेश जैन यांची भाजपच्या महापालिकेवर सत्ता होती. त्यामुळे शिवसेनेचा झालेला पराभव हा सुरेश जैन यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेच्या हातची सत्ता खेचल्याने जळगावात ४० वर्षानंतर सत्तांतर झाले आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. जळगावाती विजयांने गिरीश महाजन यांच्या ताकदीमध्ये आता वाढ झाली आहे. जलंसपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जनतेला विकासाचे आश्वासन दिले होते. त्यावर जनतेने आता विश्वास ठेवला आहे असे म्हणता येईल. जळगावातील विजयाने गिरीश महाजन यांनी सुरेश जैन यांना शह दिला आहे.

विकासाचे अाश्वासन

जळगावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले होते. त्याच आश्वासनावर विश्वास ठेवत जनतेने भाजपवर विश्वास दाखवला. त्यामुळे सुरेश जैन यांचे संस्थान समजले जाणारे जळगाव संस्थान खालसा झाले आहे. दरम्यान शिवसेनेला देखील हा जोराचा धक्का आहे.

- Advertisement -

निवडणुकीसाठी भाजपला फायदा

२०१९च्या लोकसभा आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला या विजयाचा फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे. पोटनिवडणुकीमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी भाजपविरोधात विरोधकांनी टीका केली होती. तसेच शिवसेनेने एकला चलोचा नारा दिल्याने हा विजय भाजपचे मनोधैर्य वाढवणार असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -