घरमहाराष्ट्र'उघड दार उद्धवा' म्हणत मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन

‘उघड दार उद्धवा’ म्हणत मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील धार्मिक स्थळं, मंदिरं कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे बंद आहेत. मात्र राज्यभरात कोरोनाचे नियम मोडून राज्यभरात मोठ्या गर्दीत राजकीय यात्रा आणि राजकीय सभांना परवानगी असल्याचे दिसतेय. यासोबतच हॉटेल्स, मॉल सुरु झाले असून केवळ मंदिरात जाण्यासाठीच भाविकांना रोखले जात आहे. ही मंदिर लवकरच उघडावीत, या मागणीसाठी आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावेळी फक्त मंदिरं खुली केल्यानेच कोरोना वाढतो, का असा सवाल करत भारतीय जनता पक्षाने आज राज्यभरात घंटानाद आंदोलन केले आहे.

दरम्यान, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. नाशिक, नागपूर, पंढरपूर, पुणे आणि औरंगाबाद, शिर्डी यासारख्या विविध शहरातील विविध मंदिर परिसरात घंटानाद आणि शंखनाद करत भाजपने मंदिरं उघडण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात आता सर्वच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र त्यानंतरही मंदिर आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने राज्यभऱात भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

राज्यातील मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावी, या मागणीसाठी नाशिकमध्ये ही निदर्शनं झाली. भाजप अध्यात्मिक आघाडीच्या वतीने रामकुंड परिसरात आंदोलन करण्यात आले, यावेळी साधू महंतांसह भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली. नाशिकमध्ये आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. तर पुण्यातील कसबा गणपती मंदिरासमोर भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मंदिराबाहेर जन्माष्टमीचा मुहूर्त साधत भाजपने मंदिरं उघडण्यासाठी जोरदार मागणी केली. लोकांच्या धार्मिक भावनेचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंदिरं उघडावीत, अशी मागणी केली. यासोबतच मुंबई, शिर्डी, औरंगाबाद, बुलडाणा आणि अमरावतीसह राज्यभरात भाजपाकडून घंटानाद आणि शंखनाद आंदोलन केले जात आहे. औरंगाादमध्येही शहर भाजप आघाडीच्या वतीने शहरातील मध्यवर्ती भागातील गजानन मंदिर परिसरात शंखनाद आणि घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.


Kabul Airport Attack: काबूल विमानतळाजवळ आज पुन्हा एअरस्ट्राइक

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -