घरमहाराष्ट्रज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय..., संजय राऊत यांच्या कथित फोटोला भाजपाचे प्रत्युत्तर

ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय…, संजय राऊत यांच्या कथित फोटोला भाजपाचे प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र भाजपाच आता ट्विटर वॉर सुरू झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित फोटोचे निमित्त झाले असून ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलिकडे जाऊ शकत नाही, असा पलटवार भाजपाने केला आहे.

हेही वाचा – संजय राऊतांकडून भाजपाच्या नेत्याचा कथित फोटो ट्वीट; काँग्रेसने सीबीआय चौकशीची केली मागणी

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. त्यातील व्यक्ती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखी दिसते. महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मकाऊमध्ये साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्यूत खेळले तर बिघडले कोठे? अशी कॅप्शन देतानाच, ‘फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

तसेच, ते म्हणे कुटुंबीयांसह मकाऊला गेले आहेत. त्यांच्यासोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. हे ट्वीट त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

तर, महाराष्ट्र भाजपाने ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांचा फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी तेथील हा परिसर आहे. ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही, असा पलटवार भाजपाने केला आहे. आम्हाला फक्त संजय राऊत यांनी सांगावे, आदित्य ठाकरे यांच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की आहे? असा सवालही केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -