घरमहाराष्ट्रसंजय राऊतांकडून भाजपाच्या नेत्याचा कथित फोटो ट्वीट; काँग्रेसने सीबीआय चौकशीची केली मागणी

संजय राऊतांकडून भाजपाच्या नेत्याचा कथित फोटो ट्वीट; काँग्रेसने सीबीआय चौकशीची केली मागणी

Subscribe

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कथित एक फोटो ट्वीट केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून युझर्स कमेंट करताना दिसत आहेत. अशातच काँग्रसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. (Alleged photo tweet of BJP leader by Sanjay Raut Congress Nana Patole demanded a CBI probe)

हेही वाचा  – कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री सपशेल अपयशी, अकोल्याच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंचे शरसंधान

- Advertisement -

संजय राऊत हे भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नेहमी टीका करताना दिसतता. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विश्वचषक सामन्यावरून नाव न घेता मोदी सरकारवर निशाणा साधला होता. अशातच आता त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा कथित फोटो ट्वीट केला आहे. ज्यात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झुम करुन पहा…ते तेच आहेत ना? असा प्रश्न उपस्थित करत पिक्चर अभी बाकी है…, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय राऊत चंद्रशेखर बावनकुळे यांचे आणखी फोटो ट्वीट करणार का? हे पाहावे लागेल.

- Advertisement -

दरम्यान, संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोबद्दल नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा या परिस्थितीमध्ये संजय राऊत यांना ट्वीट केलेला फोटो भाजपाच्या प्रदेशाध्यक्षाचा दिसत आहे, तो तपासला गेला पाहिजे. हे खरं आहे नाही हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी तपासले पाहिजे. याप्रकरणी एक चौकशी लावली पाहिजे. गरज पडली तर सीबीआयची चौकशी यामध्ये व्हायला पाहिजे.

हेही वाचा – ‘या’चा विचार करणार आहात की नाही? सुषमा अंधारे यांचा जरांगे आणि भुजबळ यांना सवाल

राज्य दिवाळखोरीत निघालं आहे

एकीकडे राज्याची तिजोरी कंगाल झाली आहे. राज्य दिवाळखोरीत निघालं आहे. राज्यामधील कंत्राटदारांना दहा हजार कोटी रुपये मिळाले नाही, म्हणून ते संपावर चालले आहेत. असे असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कॅसिनेमध्ये जाऊन जुगार खेळत असतील तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे. त्यामुळे याचा तपास झाला पाहिजे. संजय राऊत यांनी हा फोटो कुठून आणला आहे, हे मला माहित नाही. पण हा विषय गंभीर आहे, अशी स्पष्ट भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -