घरमहाराष्ट्रसोलापूरला भाजपचाच महापौर; प्रणिती शिंदे यांचा दावा ठरला खोटा

सोलापूरला भाजपचाच महापौर; प्रणिती शिंदे यांचा दावा ठरला खोटा

Subscribe

सोलापूर महानगरपालिकेत महापौरपद राखण्यात भाजपला यश आले आहे. भाजपच्या उमेदवार श्रीकांचना यन्नम या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर विराजमान होईल, असा दावा केला होता. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे. भाजपच्या श्रीकांचना यांना एकूण ५१ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे निवडीच्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा इत्यादी पक्षांच्या नेत्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपला जिकंण्यात सहज यश आले.

सोलापूर महानगरपालिकेसाठी आज महापौरपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपच्या श्रीकांचना यन्नम यांची पहिल्यांदा महापौरपदी निवड झाली आहे. त्या विणकर समाजातील पहिल्या विणकर महापौर ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्धी एमआयआमच्या शाहजादीबानो शेख यांचा ५१ विरुद्ध ८ मतांनी पराभव केला आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसचे १६, राष्ट्रवादीचे ४, बसपाचे ३ आणि शिवसेनेचे २० नगरसेवक तटस्थ राहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -