घरताज्या घडामोडी'आयटीएमएस प्रकल्पा'साठी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर 2 तासांचा ब्लॉक

‘आयटीएमएस प्रकल्पा’साठी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर 2 तासांचा ब्लॉक

Subscribe

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर 2 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांटचा पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. (Block On Pune Mumbai Express Way Today for Itms System)

या इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम प्रकल्पासाठी शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे. किवळे ते सोमटने यादरम्यान हे काम केले जाणार आहे. या दोन तासासाठी वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली जाणार आहे.

- Advertisement -

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरर इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय सरकराने घेतला आहे. 340 कोटींचा हा प्रकल्प असून, यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील 10 वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत.

इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम कसे काम करते?

- Advertisement -
  • इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम.
  • या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल.
  • या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे.
  • महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे.
  • प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे.
  • अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल.
  • संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल.
  • हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील.
  • त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील.
  • 39 ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत.

आयटीएमएस सिस्टीम काय आहे?

  • इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम
  • वाहनं टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
  • यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल
  • वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील.
  • ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
  • सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
  • द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल
  • संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
  • अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याची ही कल्पना सेन्सर मुळं मिळेल
  • अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल अन तातडीची मदतही पोहचेल.

हेही वाचा – शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र विधिमंडळात

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -