घरमहाराष्ट्रडॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिका यंत्रणा सज्ज; चैत्यभूमीवर विशेष व्यवस्था

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त महापालिका यंत्रणा सज्ज; चैत्यभूमीवर विशेष व्यवस्था

Subscribe

मुंबई: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने अनुयायी यांची होणारी संभाव्य गर्दीची शक्यता लक्षात घेता मुंबई महापालिकेने चैत्यभूमी परिसर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान असणाऱ्या ‘राजगृह’ याठिकाणी जय्यत तयारी केली आहे. पालिकेने खानपान, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था, विश्रांती कक्ष आदीं विविध सेवासुविधा उपलब्ध केल्या आहेत.
मुंबई महापालिकचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर ) आशीष शर्मा यांनी गुरुवारी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर भेट देऊन मुंबई महापालिकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.

तसेच, अनुयायांसाठी सेवा सुविधांची योग्य रीतीने पूर्तता करण्यासाठी सर्व यंत्रणांच्या अधिकारी वर्गाला सूचना दिल्या. त्यांच्यासोबत महापालिकेचे ‘परिमंडळ २’ चे उपआयुक्त रमाकांत बिरादार आणि ‘जी/उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळ हजर होते. तसेच, मुंबई पोलीस परिमंडळ ५ चे उपआयुक्त मनोज पाटील आणि सहाय्यक आयुक्त अविनाश कानडे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

महापालिकेकडून यंदाच्या जयंती दिनानिमित्त नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमी परिसरात पाच एलईडी स्क्रिनद्वारे चैत्यभूमीच्या आतील अभिवादनाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यासोबतच आरोग्य सुविधा, क्लोज सर्कीट टिव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी आणि अग्निशमन व नियंत्रण कक्ष सेवा आदींचा या सुविधांमध्ये समावेश आहे.

डॉ.आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारीत लेजर शो आणि छायाचित्रांचे प्रदर्शन
यंदा पहिल्यांदाच अनुयायांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनपटावर आयोजित एका विशेष लेजर शो चे आयोजन माता रमाबाई व्ह्युईंग डेक येथे १३ एप्रिल व १४ एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात येणार आहे. तसेच,महापालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महानगरपालिकेचे एक हजार कर्मचारी कार्यतत्पर असणार आहेत.

- Advertisement -

 

चैत्यभूमी परिसरात सुशोभिकरणाची कामे
चैत्यभूमी परिसरातील स्तूपासह सभोवतालच्या रेलिंगला रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्तूपाची सजावट ही विविध रंगांच्या फुलांनी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून चैत्यभूमी परिसरातील उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच चैत्यभूमी येथील तोरणा गेटची रंगरंगोटीही करण्यात आली आहे. चैत्यभूमी परिसरातील अशोक स्तंभाची रंगरंगोटी आणि सुशोभीकरणही करण्यात आले आहे. त्याचबरोबर याच ठिकाणी असणाऱ्या भीमज्योतीला सुंदर पद्धतीने फुलांची सजावट करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर स्मृती व्हिवींग डेकलाही सजवण्यात आले आहे.

 

महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध सेवासुविधा 
# आरोग्य तपासणी कक्ष

# वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी १६

# थेट प्रक्षेपणासाठी पाच एलईडी स्क्रिनचा वापर

# समाजमाध्यमांवर लाईव्ह प्रक्षेपण

# अनुयायांसाठी मिनरल वॉटर पिण्याच्या पाण्याची टॅंकरद्वारे २४ तास व्यवस्था

# फिरती शौचालये – १०

# अग्निशमन दलाचे फायर इंजिन आणि टॅंकर तैनात

# सीसीटीव्हीची यंत्रणा

# स्पीडबोटची व्यवस्था

# स्वच्छतेसाठी कामगार अविरत कार्यरत

# स्वयंसेवी संस्था स्वच्छतेसाठी मदत करणार

# महापालिकेचे १ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यतत्पर राहणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -