घरताज्या घडामोडीशिवसेना नोंदणीकृत पक्ष, राज्यात काय करायचं हे तुम्ही ठरवणार का?, अरविंद सावंतांचा...

शिवसेना नोंदणीकृत पक्ष, राज्यात काय करायचं हे तुम्ही ठरवणार का?, अरविंद सावंतांचा हल्लाबोल

Subscribe

शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. दोन्ही गटांचे मेळावे मुंबईमध्ये पार पाडले. तसेच दोन्ही गटातून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, आता दसरा मेळाव्याच्या राजकारणानंतर धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला मिळणार, यावर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान शिवसेना नोंदणीकृत पक्ष असून राज्यात काय करायचं हे तुम्ही ठरवणार का?, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

अरविंद सावंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगासमोरील सुनावणीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. तसेच, त्यांनी यावरून वेगवेगळी विधानं करणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केली.

- Advertisement -

शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हे सगळे चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. हे आमच्यासोबत आहेत. फक्त आमदार-खासदार म्हणजे पक्ष नाही. शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. त्या नोंदणीकृत पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यामधून त्यांची निवड झाली आहे. त्यांची मुदत अद्यापही संपलेली नाही. तसेच त्यांना कुणी निष्काषित केलेलं नाही. मग तुम्हाला कुणी अधिकार दिले?, असा सवाल अरविंद सावंतांनी उपस्थित केला.

सुरत, गुवाहाटी, गोवा अशा बाहेरच्या राज्यांमधून आमच्या राज्यात काय करायचं हे तुम्ही ठरवणार का? सुरत, गुवाहाटीला एवढे पोलीस का देण्यात आले? हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे, असं सावंत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : भारताची अर्थव्यवस्था दारुड्यासारखी झालीय, प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -