घरताज्या घडामोडीलखनऊ-गाझीपूरला जोडणारा पूर्वांचल एक्स्प्रेस वेवरील रस्ता खचला

लखनऊ-गाझीपूरला जोडणारा पूर्वांचल एक्स्प्रेस वेवरील रस्ता खचला

Subscribe

लखनऊ परिसरात जोरदार पाऊस पडत होता. या मुसळधार पावसामुळे गुरूवारी रात्रीच्या सुमारास पूर्वांचल एक्स्प्रेस वे वरील रस्ता खचला. त्यामुळे मोठा खड्डा निर्माण झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सतत देशाच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे लखनऊ येथून गाझीपूरला जोडणारा पूर्वांचल एक्स्प्रेस वेवरील रस्ता खचला. रस्ता खचल्याने सुमारे 15 फुटांहून अधिक खोल खड्डा पडला आहे. (damaged road cars burnt Purvanchal Expressway inaugurated pm narendra modi)

लखनऊ परिसरात जोरदार पाऊस पडत होता. या मुसळधार पावसामुळे गुरूवारी रात्रीच्या सुमारास पूर्वांचल एक्स्प्रेस वे वरील रस्ता खचला. त्यामुळे मोठा खड्डा निर्माण झाला आहे. तसेच, एक्स्प्रेस वे वरून जाणारी एक गाडी या खड्ड्यात पडली. दरम्यान, सध्या प्रशासनाकडून हा खड्डा रातोरात बुजवण्यात आला आहे.

- Advertisement -

पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर रस्ता खचल्याने यूपी काँग्रेसने ट्वीट करून सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच हा खड्डा सरकारच्या भ्रष्टाचाराचा पुरावा असल्याचे म्हटले आहे. तब्बल 22 हजार कोटी रुपये खर्च करून हा एक्स्प्रेस वे तयार करण्यात आला होता. जवळपास 340 किमी लांब हा एक्स्प्रेस वे होता.

दरम्यान, प्रशासनाने त्वरित कारवाई करत रातोरात हा खड़्डा बुजवून रस्ता सुरळीत केला. या खड्यामुळे अनेक कार दुर्घटनाग्रस्त झाल्या. मात्र सुदैवाची बाब म्हणजे या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

या पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 नोव्हेंबर 2021 रोजी केले होते. या प्रकल्पामधून लखनऊ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुल्तानपूर, आंबेडकरनगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूरला जोडण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे या एक्स्प्रेस वेवर हलियापूर येथे अचानक रस्ता खचला. जवळपास 15 फूट खोल खड्डा पडला.

या घटनेची माहिती मिळताच पूर्वांचल एक्स्प्रेस-वेवर आपातकालिन स्थितीमध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी सुल्तानपूर येथे 3.2 किमी लांब धावपट्टीही बांधण्यात आली आहे.


हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ कोणाकडे? निवडणूक आयोगाकडून 14 ऑक्टोबरपर्यंत निर्णय अपेक्षित

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -