घरमहाराष्ट्रऔरंगाबाद : मोबाईलमध्ये चित्रिकरण करत तरुणाने केली आत्महत्या

औरंगाबाद : मोबाईलमध्ये चित्रिकरण करत तरुणाने केली आत्महत्या

Subscribe

औरंगाबादमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या तरुणाने आत्महत्येचे चित्रिकरण केले होते.

मोबाईलमध्ये चित्रिकरण करत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. मुकेश साळवे असे या युवकाचे नाव आहे. मुकेशने आत्महत्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले होते. पोलिसांना मुकेशच्या मोबाईलमध्ये तब्बल ५७ मिनिटांचे चित्रिकरण आढळून आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

औरंगाबादमधील न्यायनगर भागात मुकेश साळवी हा तरुण राहत होता. हा तरुण एका वॉशिंग सेंटरवर कामाला होता. त्याला दोन भाऊ आणि आई वडील असा परिवार आहे. तर आई वडील मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, संपूर्ण कुटुंब मूळ गाव निल्लोड इथे गेले होते. त्यावेळी मुकेशने घरात कोणी नसल्याचे पाहून घराच्या छताला नायलॉन दोरीने बांधून गळफास घेतला. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी मुकेशने आत्महत्येचे संपूर्ण चित्रिकरण मोबईलमध्ये करुन ठेवले होते. हे एकूण ५७ मिनिटांचे चित्रिकरण असून या मोबईलमध्ये अजून एक १८ सेकंदाचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘माझ्या आत्महत्येप्रकरणी कोणालाही जबाबदार धरु नये‘. मात्र, मुकेशने आत्महत्या का केली असावी याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या मुकेशच्या आत्महत्ये प्रकरणी पोलीस शोध घेत असून याघटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video : चाहत्याच्या आईने केली बुमराहची नक्कल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -