घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील 'ब्रम्हपुरी' ठरले देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण

महाराष्ट्रातील ‘ब्रम्हपुरी’ ठरले देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण

Subscribe

ब्रम्हपुरीचा पारा पोहचला ४०.१ अंश सेल्सिअसवर

राज्यात हिवाळानंतर पुन्हा उन्हाची तीव्र झळ जाणवू लागली आहे. यातच विदर्भात सर्वाधिक उष्णतेची नोंद होत आहे. सोमवारी विदर्भाचा पारा ४० अं.से वर पोहचला होता. तर विदर्भातील ब्रह्मपुरी भागात देशातीव सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद झाली आहे. बह्मपुरीत ४०.१ एवढ्या उष्ण तापमानाची नोंद एकट्या सोमवारी झाली आहे. त्याखालोखाल अकोल्यात ३९.५ तर चंद्रपुरात ३९.४ अं.से इतक्या उष्ण तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे सोमवारी एकट्या विदर्भातील तीन शहरांच्या तापमानाची नोंद देशातील देशातील सर्वाधिक उष्ण तापमान म्हणून झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यातील तापमान चाळीशी गाठत आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांना घराबाहेर पडणेही अवघड होत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली. तर सोमवारी विदर्भात ३८.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान वाढीचे नवे रेकॉर्ड सुरु झाले आहेत. त्यामुळे शहरांच्या रस्त्यावर नागरिक लिंबू रसबत तसेच सावलीचा आसरा घेताना दिसू लागले आहेत. मार्च महिन्यापासूनचं तापमान वाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये तापमानाचा पार कुठवरं पोहचेल असा यक्ष प्रश्न विदर्भकरांना पडला आहे. यापुढील वातावरणंही कोरडे राहणार असून किमान तापमान ३९ अंशापर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

 हेही वाचा- Coronavirus: राज्यातील कोरोनाला एक वर्ष पूर्ण; सध्याची काय आहे परिस्थिती?

 

 

- Advertisement -

 

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -