Live Update : भाजपची हॉटेल ताजवर बैठक, देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी दाखल 

Maharashtra Breaking News

भाजपची हॉटेल ताजवर बैठक, देवेंद्र फडणवीस बैठकीसाठी दाखल


काँग्रेसच्या आमदारांसह नेत्यांची बैठक, मल्लिकार्जुन खरगेंच्या उपस्थितीत बैठक


अविनाश भोसले यांना हायकोर्टाचा दिलासा

मालमत्ता ताब्यात न घेण्याचे ईडीला आदेश


राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर

18 जुलैला मतदान होणार

21 जुलैला निकाल लागणार

देशातील 776 खासदार आणि 4033 आमदार मतदानाचा हक्क बजावणार


औरंगाबाद-कन्नडमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू निकामी
फर्निचरच्या दुकानात सापडलेली बॉम्ब सदृश्य वस्तू


मनसेच्या निलेश माझिरेंकडे पुन्हा कामगार सेना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते निलेश माझिरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे ‘जिल्हाध्यक्ष’ पदी निवड करण्यात आली आहे.


काँग्रेसकडून भाई जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज

चंद्रकांत हंडोरेंनी भरला उमेदवारी अर्ज

विधान परिषदेसाठी उमेदवारांनी भरला अर्ज


संजय राऊतांना किरीट सोमय्यांच्या बदनामी प्रकरणी समन्स

शिवरी न्यायालयाने प्रा. डॉ. मेधा किरीट सोमय्या यांच्या बदनामीच्या तक्रारीची दखल घेतली, संजय राऊतना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्या साठी समन्स काढले

अपक्ष आमदार किशोर जोरगेवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

राज्यसभा निवडणुकीच्या काही तासांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


राष्ट्रपती निवडणुकीबाबत आज राष्ट्रीय निवडणूक आयोग घोषणा करणार

दुपारी ३ वाजता होणार निवडणुकीची घोषणा

निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

फडणवीस आजपासून बैठकांमध्ये होणार सक्रिय

 


राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे विधान परिषदेसाठी डमी उमेदवारी अर्ज दाखल करणार

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी

एकनाथ खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार


मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग

मुंबईच्या मानखुर्दमध्ये भीषण आग

अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल


नागपूरमध्ये ३ दिवसांत उष्माघातामुळे ४ जणांचा मृत्यू


मुंबईत तीन मजली इमारत कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईतील वांद्रा येथील शास्त्रीनगरमध्ये रात्रीच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली

(सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणुकीसाठी एक दिवसाचा जामीन मिळणार का? आज होणार निर्णय


मुंबईत आजपासून दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्याला हेल्मेट घालावे लागणार, अन्यथा मुंबई पोलीस करणार कारवाई

नव्या नियमांची होणार अंमलबजावणी


मुंबईत पावसाची हजेरी, माटुंगा परिसरात तुरळक पाऊस

वांद्रा येथे रिमझीम पावसाच्या सरी