घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातला पूल 9 ते 10 सेकंदात होणार जमीनदोस्त, चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीला...

पुण्यातला पूल 9 ते 10 सेकंदात होणार जमीनदोस्त, चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीला होता कारणीभूत

Subscribe

पुणे – चांदणी चौकातील वाहतूक कोंडीला कारणीभूत असणारा पूल 18 सप्टेंबरला पाडण्यात येणार आहे. त्यासाठी पुलावरून होणारी वाहतूक आजपासून बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेताल आहे. पूल पाडण्यात आल्यानंतर येथील वाहतूक व्यवस्थेत काय बदल होणार हे वाहतूक नियंत्रण विभागाकडून स्पष्ट केले जाणार आहे. हा पुलही काही सेकंदात पाडला जाणार असल्याने त्याकडे साऱ्या पुणेकरांचे याकडे लक्ष लागले आहे.

हा पूल बंद करण्यात आल्यानंतर ज्या नागरिकांना बावधान आणि पाषाणकडे जायचे आहे, अशा नागरिकांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे. 18 संप्टेंबरला पहाटे हा पूल पाडण्यात येणार असून दिल्लीतील ट्विट टॉवर ज्या कंपनीने पाडले त्याच कंपनीला पूल पाडण्याचे कॉन्टॅक्ट देण्यात आले आहे.

- Advertisement -

10 सेकंदात पाढणार पूल –

अवघ्या 9 ते 10 सेकंदात हा पूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी चांदणी चौकात सुरू करण्यात आली आहे. हा पूल नऊ ते दहा सेकंदात पाडला जाणार असल्याने परिसरातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून यासाठी प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली आहे.

- Advertisement -

वाहतुकीत बदल –

सध्या प्रायोगिक तत्त्वावर येथील वाहतूक वळविण्यात आली असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. यासाठी वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे सागंण्यात आले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -