घरमहाराष्ट्रनाशिकBus Accident : नाशिकच्या सप्तश्रृंगीगड घाटात बसचा भीषण अपघात; अनेक जण जखमी

Bus Accident : नाशिकच्या सप्तश्रृंगीगड घाटात बसचा भीषण अपघात; अनेक जण जखमी

Subscribe

Bus Accident : समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळ एका खासगी बसच्या भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या सप्तश्रृंगी घाटातील एसटी बसला अपघात झाला आहे. घाटातील गणपती पॉईंटजवळ हा अपघात झाला. स्‍थानिक नागरिक आणि प्रशासनाच्यावतीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या बसमधून प्रवास करणारे अंदाजे 35 जण जखमी झाले आहेत, तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच अपघातातील जखमींवर नांदुरी व वणी ग्रामीण रूग्‍णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे हे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. (Bus Accident A terrible bus accident in Nashiks Saptshringigad ghat Many injured)

हेही वाचा – ठाण्यात एका घराची भिंत व काही भाग कोसळला, बाजूच्या 3 कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव आगाराची बस रात्री सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी होती. पहाटेच्या सुमारास बस खामगावच्या दिशेने जायला निाघाली. यावेळी वणी गड उतरत असताना दाट धुक्याचा परिसर, सातत्याने पडणारा पाऊस आणि घाटात असलेल्या अवघड वळणांवर चालकाचा ताबा सुटल्याने बसचा भीषण अपघात झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वणी गडावरील गणपती पॉईंटजवळ पहाटे पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. असून बसमधून 20 ते 25 प्रवासी प्रवास करण्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी 18 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, बचावपथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमी प्रवाशांना वणी उपरुग्णालयात नेले जात आहे.

हेही वाचा – Maharashtra Rain : राज्यावर पुढील 10 दिवस अस्मानी संकट; ‘या’ भागांना मुसळधार पावसाचा इशारा

- Advertisement -

संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना

दादाजी भुसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सप्तश्रृंगी घाटात एसटी बस अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वोतपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील 18 प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही, यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आई सप्तश्रृंगी माता सर्वांना सुरक्षित ठेवो हीच प्रार्थना, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भूसे यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शोक व्यक्त

नाशिकच्या वणी सप्तश्रृंगी घाटात झालेल्या एसटी बस अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

एसटी महामंडळाकडून महिलेच्या वारसाला दहा लाखांची मदत 

नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एसटी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -