घरट्रेंडिंगजीवघेणी सहल; १० विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

जीवघेणी सहल; १० विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

Subscribe

अपघातग्रस्त बसमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे सुमारे ६७ विद्यार्थी होते. या भीषण अपघातानंतर मृत तसेच जखमी मुलांच्या पालकांमध्ये व आप्तेष्टांमध्ये खूप मोठी शोककळा पसरली आहे.

शाळकरी विद्यार्थी मोठ्या उत्साहात आणि आनंदात सहल संपवून परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. सहलवीरुन परतणारी त्यांची बस थेट ३०० फूट दरीत जाऊन कोसळली आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. हा अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये १० विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर ५० पेक्षा जास्त विद्यार्थी जबर जखमी झाले. गुजरातच्या सुरत शहरात सहलीसाठी गेलेले हे विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग शनिवारी संध्याकाळी उशिरा परत येत असताना,  महाराष्ट्रालगतच्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत त्यांची बस कोसळली. ANI वृत्तसंस्थेने या अपघाताचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे सुमारे ६७ विद्यार्थी होते. या भीषण अपघातानंतर मृत तसेच जखमी मुलांच्या पालकांमध्ये व आप्तेष्टांमध्ये खूप मोठी शोककळा पसरली आहे.


सविस्तर घटना…

प्राथमिक माहितीनुसार, सुरतवरुन परतत असताना महाल-बर्डीपाडा घाटात चालकाचं बसवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे बस थेट ३०० फूट दरीत जाऊन कोसळली. शबरीधाम, पंपा सरोवर आणि महाल कॅम्प ही दोन शेवटची ठिकाणं पाहून, विद्यार्थी घरी परतत होते. अमरोली गावातील खासगी शिकवणी क्लासेसची ही बस होती. सर्व विद्यार्थी अमरेली गावातीलच रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे. काल सायंकाली ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, अपगातची माहिती मिळताच बचाव पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना दरीतून बाहेर काढले. उपलब्ध माहितीनुसार मृत विद्यार्थ्यांच्या घरी संपर्क साधण्यात आला असून, जखमी विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -