घरट्रेंडिंगभाजप नगरसेवकांचा निवडणूक फंडा; कोकणात गणपतीसाठी बसगाड्या सोडणार

भाजप नगरसेवकांचा निवडणूक फंडा; कोकणात गणपतीसाठी बसगाड्या सोडणार

Subscribe

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकार पायउतार झाके आणि भाजप - बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. सत्तेवर येताच गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवात जाचक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना राज्यात सत्तांतर झाले. महाविकास आघाडी सरकार पायउतार झाके आणि भाजप – बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. सत्तेवर येताच गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवात जाचक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता भाजपच्या प्रत्येक माजी नगरसेवकाने कोंकणी मते भाजपकडे वळविण्यासाठी गणेशोत्सवात प्रत्येकी २ बस गाड्यांची व्यवस्था करण्याचे फर्मान मुंबई भाजपने काढले असल्याचे समजते. (Bus will leave for Ganpati in Konkan from BJP)

मुंबई महापालिकेतील भाजपच्या नगरसेवकांची महत्वपूर्ण बैठक सोमवारी पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत माजी नगरसेवकांना भाजपचे आमदार योगेश सागर व माजी नगरसेवक व गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

- Advertisement -

मुंबईत पावसाळा संपल्यावर म्हणजे सप्टेंबरनंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. या निवडणुकीसाठी भाजपच्या माजी नगरसेवकांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या जास्तीत जास्त संपर्कात राहून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच, पुढील महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव सुरू होणार आहे.

मुंबईत राहणारे कोकणस्थ हे कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवर्जून जातात. त्यामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांनी गणेशोत्सव सणासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या कोकणस्थ मतदारांसाठी प्रत्येकी २ बसगाड्यांची व्यवस्था करावी, असे भाजपच्या नगरसेवकांसाठी फर्मान काढण्यात आले असल्याचे सुत्रांकडून समजते.

- Advertisement -

सध्या पावसाळा असल्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांबाबत नागरिकांना आरोग्य शिबिरे भरवून विविध वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध करणे. नागरी समस्या सोडविणे. रस्ते, खड्डे, पाणी समस्या मार्गी लावणे. पावसाळ्यात छत्र्यांचे वाटप करणे. काही अडचणी उद्भवल्यास वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन उपाययोजना करणे आदी कानमंत्र भाजपच्या माजी नगरसेवकांना देण्यात आले.


हेही वाचा – धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हालाच मिळेल, आमच्याकडे जास्त संख्या; संजय शिरसाटांचा दावा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -