घरताज्या घडामोडीजलयुक्त शिवार योजनेची चौकशी राजकीय आकसापोटी - चंद्रकांत पाटील

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी राजकीय आकसापोटी – चंद्रकांत पाटील

Subscribe

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी होणार आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले आहेत. जलयुक्त शिवार योजनेची चौकशी राजकीय आकसापोटी केली जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. जलयुक्त शिवार मोहीमेत जनसहभाग होता. त्यांची देखील चौकशी करमार का? असा सवाल सरकारला केला आहे.

“सरकार तुमचं आहे चौकशी करु शकता. जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. पण जलयुक्त शिवार ही मोहीम केवळ सरकारच्या पैशावर चालली नाही. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावागावातील जनसहभाग आहे. त्यांची पण चौकशी करणार का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. जलयुक्त शिवाराची अट होती की प्रत्येक गावाचा सहभाग शारीरीक आणि आर्थिक असला तरच सरकारी पैशांचं नियोजन चांगल्या प्रकारे होईल. या मोहीमेत आमिर खान, नान पाटेकर, मकरंद अनासपुरेसह अनेकजण या मोहिमेमध्ये होते,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

“या मोहिमेमुळे पाण्याचा साठा वाढला. शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. शेतकऱ्यांनी दोन दोन पीकं घेतली. दुष्काळी भागात पाण्याच्या टँकरचे प्रमाण कमी झालं. या मोहीमेत ६ लाख ४१ हजार ५६० इतकी कामं झाली. या कामांमधली ११२८ कामं कॅगने तपासली. म्हणजे ०.१७ टक्के. याचा अर्थ ९९.८३ ट्क्के कामांचा तपासच केला गेला नाही २२, ५८९ गावांमध्ये जलयुक्त शिवाराची कामं झाली. १२० गावांमधील कामं कॅगने तपासली. कॅगने संपूर्ण कामाची तपासणी केली नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


हेही वाचा  –पोट भाजपचं दुखतंय पण बाळंतकळा राज्यपालांना; शिवसेनेचा राज्यपालांवर टीकेचा बाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -