घरताज्या घडामोडी'सोमय्या घाबरणार नाहीत' जशास तसे उत्तर देऊ, शिवसैनिकांच्या राड्यावर चंद्रकांत पाटलांचा इशारा

‘सोमय्या घाबरणार नाहीत’ जशास तसे उत्तर देऊ, शिवसैनिकांच्या राड्यावर चंद्रकांत पाटलांचा इशारा

Subscribe

किरीट सोमय्या यांच्यावर आज पुण्यात शिवसेनेकडून प्राणघातक हल्ला झाला. परमेश्वर कृपेने या हल्ल्यातून किरीटजी बचावले. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. किरीटजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महापालिकेत शिवसैनिकांनी हल्ला केला. किरीट सोमय्या धक्काबुक्कीमध्ये पालिकेच्या पायऱ्यांवर पडले यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. सोमय्यांना कोणतीही इजा झाली नाही. परंतु भाजपच्या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. हल्ला केला म्हणून सोमय्या घाबरणार नाही. जशास तसे उत्तर देऊ असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. सत्ताधाऱ्यांचा आता मूळ चेहरा दिसू लागला अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर आज पुण्यात शिवसेनेकडून प्राणघातक हल्ला झाला. परमेश्वर कृपेने या हल्ल्यातून किरीटजी बचावले. त्यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. किरीटजी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत. असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

फडणवीसांकडून हल्ल्याचा निषेध

भाजप नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही?, आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे?, आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही. असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच घटनेचा निषेध करत असून राज्यात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.


हेही वाचा : Breaking : पुण्यात शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भिडले, किरीट सोमय्यांना धक्काबुक्की

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -