Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी आमदार सचिन कल्याणशेट्टी सोलापूर भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

आमदार सचिन कल्याणशेट्टी सोलापूर भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Subscribe

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाच्या प्रभारीपदी रवींद्र अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा पत्रकाद्वारे केली आहे.

अनासपुरे अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम पाहत आहेत. पक्षात विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. सध्या ते उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

- Advertisement -

आमदार कल्याणशेट्टी हे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट मतदारसंघातून २०१९ मध्ये विधानसभेवर निवडून आले. त्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे अक्कलकोट तालुक्यात भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांनी पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत. अनासपुरे आणि आमदार कल्याणशेट्टी या दोघांनाही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीने अखेर जिल्ह्यातील आमदार असलेल्या आपल्या मूळच्या कार्यकर्त्याला पसंती दिली आहे. त्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, सोलापूर शासकीय विश्रामगृहावर येत्या दोन दिवसांत भारतीय जनता पार्टीचे सर्व खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीत नूतन जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा : राज ठाकरे यांनी भाजपाचे कंत्राट घेतले, सुषमा अंधारेंची टीका


 

- Advertisment -