घरताज्या घडामोडीआंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास दुसरा गेट ऑफ इंडिया म्हणून करणार - आदित्य ठाकरे

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास दुसरा गेट ऑफ इंडिया म्हणून करणार – आदित्य ठाकरे

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या हा परदेशातून आल्यानंतरचे महत्वाचे असे ठिकाण आहे. पण या ठिकाणाहून बाहेर पडताना सगळा गोंधळ, वाहतूक कोंडी पहायला मिळते. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी असते त्यामुळे या परिसरात बराचसा वेळ या परिसरात जातो. म्हणूनच मुंबईचा दुसरा गेटवे ऑफ इंडिया असणाऱ्या टर्मिनल २ च्या ठिकाणी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा यापुढच्या काळातील प्रयत्न असणार आहे अशी ग्वाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. टर्मिनल २ च्या ठिकाणी सुरू असलेल्या भूयारी मार्गामुळे याठिकाणची वाहतूक कोंडी फुटण्यासाठी मदत होईल. तसेच पश्चिम द्रुतगती मार्गावर बाहेर आल्यानंतर अनेक गोष्टी बदलण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते टी २ टर्मिनलच्या बाहेर दोन भुयारी मार्गाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलेत होते.

आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट असलेल्या टी २ टर्मिनलच्या बाहेर आल्यावर जे चित्र दिसते ते म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडीचे. अनेक ठिकाणी लोक बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हाच गोंधळ मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. टी २ च्या ठिकाणी सुरू असणारे भुयारी बोगद्याचे काम हा त्याचाच भाग असणार आहे. येत्या दोन वर्षांमध्ये याठिकाणची वाहतूक कोंडी सुटेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या जो मोठा वळसा घालून टी २ च्या ठिकाणी जावे लागते, तो वाहतूकीचा वेळ वाचेल असेही ते म्हणाले. यापुढच्या काळात पश्चिम द्रुतगती मार्गावर अधिकाधिक हिरवळ कशी निर्माण करता येईल, साईन बोर्ड, लेन मार्किंग आणि ट्रॅफिकचेही नियोजन याठिकाणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत कुठूनही कुठे चालण्याची, सायकलिंगची सुविधा
मुंबईत दहिसर ते माहीम यादरम्यान कुठूनही कुठेही चालण्याची सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न आगामी काळात असणार आहे. त्यासाठी मुंबईतील फुटपाथ अधिकाधिक चांगले करण्याचा प्रयत्न असेल. तसेच मुंबईत सध्याचे सायकल ट्रॅक अधिकाधिक कशा पद्धतीने चांगले करता येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच गेल्या काही कालावधीपासून बैठका सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

नरिमन पॉईंट ते कफ परेड ब्रीज
सध्या मंत्रालय ते कफ परेड या प्रवासा दरम्यान साधारणपणे ४० मिनिटे लागतात. पण ब्रिजने हा मार्ग कनेक्ट केला तर हे अंतर अवघ्या ३ ते ५ मिनिटात पार करणे शक्य आहे. म्हणूनच या दोन ठिकाणांच्या दरम्यान रखडलेला हा ब्रीज लवकरात लवकर पुर्ण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या कामामध्ये कोळी बांधवांचे नुकसान होणार नाही यासाठीही प्रयत्न असेल असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -