घरमहाराष्ट्रशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, रोज 15 हजार...

शेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, रोज 15 हजार जेवणाच्या थाळ्यांचे वाटप

Subscribe

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपक्रमाचा भाग म्हणून या टीमने कालपासून (30 जुलै) जेवणाचे वाटप करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील चिपळूण,महाड भगात हाहाकार माजवला होता. या विभागात दरड कोसळयाने तसेच मुसळधार पावसामुळे संपुर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकांची घरे पुरामध्ये वाहून गेली. अशातच लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या राहण्यासाठी तसेच अन्नपाण्यासाठी अनेक लोकं विविध स्तरातून मदतीचा हात देत आहेत. मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी देखील पुढाकार घेत शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून पूरग्रस्तांना दररोज 15 हजार थाळी ताजे जेवण पुरवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी  या टीमने कालपासून (30 जुलै) जेवणाचे वाटप करण्यास सुरूवात केली आहे.

या सर्व उपक्रमासंदर्भात बोलताना शेफ संजीव कपूर म्हणाले, “महाराष्ट्रातील अनेक भागात पूरस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांचे कुटूंब गमवावे लागले तसेच अनेकांची घरेही वाहून गेली. चिपळूण आणि महाडमध्ये आलेल्या पूरामुळे लोकांनाचे आतोनात हाल होत आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही. माणूसकीच्या नात्याने आम्ही या उपक्रमाची सुरूवात केल आहे.यामुळे लोकांच्या पोषक अन्न मिळू शकेल याची आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबियांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

- Advertisement -

यापूर्वी देखील मास्टर शेफ संजीव कपूर यांनी ‘फुड इज लव्ह’ हा संदेश देत स्पॅनिश-अमेरिकन मास्टरशेफ होजे अँड्रेज यांच्या सहभागाने वर्ल्ड सेंट्रल किचनच्या माध्यमातून कोरोना व्हायरस दरम्यान लोकांवर ओढवलेल्या भीषण परिस्थीत अनेकांची मदत केली होती तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांनी देशभरातील फ्रंटलाईन वर्क्ररसाठी जेवणाची सोय केली होती.


हे हि वाचा – मी पॅकेजवाला नव्हे मदत करणारा मुख्यमंत्री

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -