घरमहाराष्ट्रछोटा राजन गँगचा गुंड निलेश पराडकरला कणकवलीत अटक

छोटा राजन गँगचा गुंड निलेश पराडकरला कणकवलीत अटक

Subscribe

कणकवली येथील एका हॉटेलमधून छोटा राजन गँगचा गुंड निलेश पराडकर आणि त्याच्या साथीदारांना सिंधुदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र पहायला मिळत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात प्रचार-प्रसार करण्याची जय्यत तयारी करताना सर्वच राजकीय पक्ष दिसत आहेत. या प्रचारा दरम्यान छोट्या राजनचा हस्तकाला कणकवलीत अटक करण्यात आली आहे. कणकवली येथील एका हॉटेलमधून छोटा राजन गँगचा गुंड निलेश पराडकर आणि त्याच्या साथीदारांना सिंधुदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निलेश ऊर्फ पटल्या पराडकर असे त्याचे नाव आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई झाली आहे. तो कणकवलीतील त्रिफळमधील हॉटेलमध्ये लपून बसला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र तो कशासाठी आणि कोणासाठी आला होता याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांनी दिली आहे.

छापा टाकून पटल्या पराडकरला घेतले ताब्यात

गेल्या काही दिवसांपासून राजन गँगचा गुंड निलेश पराडकर आणि त्याचे साथीदार कणकवलीत त्रिफळ हॉटेलमध्ये मुक्कामास आले होते. या हॉटेलमध्ये राजन गँगचा गुंड निलेश पराडकर राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १० वाजता हॉटेलवर छापा टाकून निलेश पराडकरला ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

गँगचा गुंड निलेश पराडकरवरील गुन्हे

छोटा राजन गँगचा गुंड निलेश पराडकर याला काही वर्षांपूर्वी इंडोनेशियात अटक करण्यात आली होती. खंडणी, खून आणि धमकी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र आता सर्व केसेस क्रिअर असल्याचे पराडक यांनी दावा केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -