घरमहाराष्ट्रसरकार पाडून दाखवा!

सरकार पाडून दाखवा!

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपला आव्हान

राज्यातील शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. मी आजही माझी सही आपला नम्र असा करतो आणि आपल्याला खुर्चीचा मोह नाही, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते आणि ‘दैनिक सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांनी प्रथमच दीर्घ मुलाखत दिली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच राज्यातील सरकार पाडण्याची गरज नाही ते अंतर्विरोधाने पडेल, असे भाकीत केले आहे. यासंदर्भात बोलताना ठाकरे यांनी, मी हा इथेच बसलोय. सरकार पाडून दाखवा. अगदी मुलाखत सुरू असताना पाडा, असे आव्हान विरोधी पक्षाला दिले.

- Advertisement -

वयाच्या साठाव्या वर्षी मी मुख्यमंत्री आहे, हा योगायोग आहे. याचसाठी केला होता अट्टाहास असा याचा अर्थ नाही. मी आजही माझी सही आपला नम्र असा करतो. मला पदाचा मोह नाही, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. २५ आणि २६ जुलैच्या ‘सामना’च्या अंकात ही मुलाखत प्रकाशित होईल. या मुलाखतीविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -