घरताज्या घडामोडीअखेर चित्रा वाघ यांच्यासह ११ जणांच्या नियुक्त्या रद्द! आदेश जारी!

अखेर चित्रा वाघ यांच्यासह ११ जणांच्या नियुक्त्या रद्द! आदेश जारी!

Subscribe

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह एकूण ११ सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने त्याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रसेच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानंतर देखील राज्यात भाजपची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. उलट शिवसेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. सत्ता येताच आता भाजपाने विविध महामंडळावर केलेल्या नियुक्ती रद्द करण्यात आल्या असून, आज त्याचा शासन निर्णय निघाला आहे. त्याच अनुषंगाने महामंडळातील नियम ८५, (१) व नियम ६६ (१) च्या तरतुदीला अधीन राहून उपाध्यक्ष चित्रा वाघ आणि अन्य १० सदस्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली.

नियुक्त्या रद्द झालेल्या इतर सदस्या

दर्शना महाडिक – रत्नागिरी
विना तेलंग – नागपूर
शलाका साळवी – मुंबई
रितू तावडे – मुंबई
चंद्रकांता सोनकाबळे – पिपंरी
मीनाक्षी पाटील – लातूर
साधना सुरडकर – औरंगाबाद
उमा रामशेट्टी – परळी
शैलजा गर्जे – आष्टी
अर्चना डेहनकर – नागपूर

- Advertisement -

chitra wagh letter

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -