घरट्रेंडिंगJyotiba Yatra : 'चांगभलं'च्या गजरात जोतिबा डोंगर दुमदुमला; यात्रेसाठी लाखो भाविक दाखल

Jyotiba Yatra : ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा डोंगर दुमदुमला; यात्रेसाठी लाखो भाविक दाखल

Subscribe

आज ज्योतिबा यात्रेसाठी तब्बल 7-8 लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे

आज (बुधवार) चैत्र पौर्णिमेला दख्खनचा राजा जोतिबा देवाची यात्रा आहे. या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविक जोतिबाच्या डोंगरावर कालपासून दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. चैत्र पौर्णिमेची ही यात्रा तीन दिवस चालते. या यात्रेनिमित्त भाविकांसोबतच मानाच्या सासनकाठ्या देखील दाखल झाल्या आहेत. सध्या जोतिबाचा डोंगर गुलालाने न्हाऊन निघाला आहे.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार सासनकाठीची पूजा

Drought, heat affect number of devotees at Jotiba Yatra | Kolhapur News - Times of India

- Advertisement -

आज (बुधवार) यात्रेचा मुख्य दिवस असून ज्योतिबा मंदिरात पहाटे 3 वाजल्यापासून घंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन सोहळ्यास प्रारंभ झाला. 5 वाजता महाभिषेक महापूजा संपन्न झाली, त्यानंतर 10 वाजता धुपारती सोहळा पार पडला. दुपारी 1 वाजता पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे पूजन होईल. यानंतर सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल. त्यासाठी मानाच्या सासनकाठ्या जोतिबावर दाखल झाल्या आहेत. हस्तनक्षत्रावर संध्याकाळी 5:30 वाजता जोतिबा देवाची पालखी निघेल. यात्रेत भाविक ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात गुलाल-खोबऱ्याची पालखीवर होणारी उधळण होईल.

दरम्यान, जोतिबा यात्रेत एकूण 96 सासनकाठ्या सहभागी असतात. या मिरवणुकीमध्ये 20 ते 80 फुटांच्या उंच सासनकाठ्या सहभागी असतात.

- Advertisement -

कोल्हापूर ते जोतिबा डोंगरापर्यंत 24 तास एसटी सुरु

आज ज्योतिबा यात्रेसाठी तब्बल 7-8 लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे. जागोजागी पोलीस तसेच 145 सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोन द्वारे गर्दीवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच भाविकांसाठी एसटी महामंडळाच्यावतीने 24 तास बससेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

 


हेही वाचा :

Chaitra Purnima 2023: कधी आहे चैत्र पौर्णिमा? जाणून घ्या नेमकी तारीख आणि तिथी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -