घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद!

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत साधला संवाद!

Subscribe

भेटीदरम्यान ग्रामस्थांनीही विविध कामासंदर्भातील निवेदनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (आज) दुपारी काटोल तालुक्यातील कोंडासावळी गावाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गावातील शेतकऱ्यांना भेटून त्यांच्यासोबत संवाद साधला. कोंडासावळी परिसरातील शेतकऱ्यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे शेतीला झालेला प्रत्यक्ष लाभ तसेच कर्जमाफी योजना, नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळालेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कोंडासावळी या छोट्याशा गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून शेती व शेतातील उत्पादनामध्ये झालेला सकारात्मक बदल, विविध योजनांचा मिळत असलेला लाभ याबद्दलही शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांसोबत मनमोकळी चर्चा केली. मुख्यमंत्री कौटूंबिक कार्यक्रमानिमित्त कोंडासावळी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. युवा शेतकरी राकेश कोठाडे व चंद्रशेखर कडू यांनी जलयुक्त शिवारच्या कामामुळे तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या संत्रा व मोसंबीच्या बागांना कसा फायदा झाला याबद्दल मुख्यमंत्र्यांना सांगितले. जलयुक्त शिवार योजनेमध्ये लोकसहभागासाठी युवा शेतकरी पुढाकार घेत असल्याचेही, त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामस्थांनीही यावेळी विविध कामासंदर्भातील निवेदनं मुख्यमंत्र्यांकडे सादर केली. 

मुख्यमंत्र्यांनी मानले धुळेकरांचे आभार

दरम्यान, धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे, राज्यातील मंत्री  गिरीश महाजन, जयकुमार रावल यांचे अभिनंदन केले. याशिवाय धुळे निवडणुकासंठी प्रचंड परिश्रम घेणार्‍या सर्व कार्यकर्त्यांचेही त्यांनी कौतुक केले. तर दुसरीकडे फडणवीस यांनी धुळे वासीयांचेही मनापासून आभार मानले. धुळ्यातील जनतेने जो ठाम विश्वास भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर दाखविला, तो सार्थकी लावू आणि एक स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन तेथील महापालिकेच्या माध्यमातून भाजपा देईल, असे वचन त्यांनी यावेळी धुळेकरांना दिले. दोन महापालिका मिळून १४२ जागांपैकी सर्वाधिक ६४ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. राज्यात ६ नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपाने उल्लेखनीय यश संपादन केले असून, एकूण १०९ पैकी सर्वाधिक ३७ जागा भाजपाने जिंकल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -