Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर प्रश्न विचारणाऱ्या ठाकरेंच्या सरकारने वॉटर ग्रिडचा खून केला; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

प्रश्न विचारणाऱ्या ठाकरेंच्या सरकारने वॉटर ग्रिडचा खून केला; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल

Subscribe

वॉटर ग्रीड संदर्भात आपण मान्यता दिली होती. आठ पैकी एका जिल्ह्याचे टेंडर काढून कामही सुरू केले होते. परंतु, दुर्देवाने प्रश्न विचारणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वॉटर ग्रिडचा खून केला. त्याचा मुडदा पाडला. त्यामुळे कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे आम्हाला माहीत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

वॉटर ग्रीड संदर्भात आपण मान्यता दिली होती. आठ पैकी एका जिल्ह्याचे टेंडर काढून कामही सुरू केले होते. परंतु, दुर्देवाने प्रश्न विचारणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वॉटर ग्रिडचा खून केला. त्याचा मुडदा पाडला. त्यामुळे कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे आम्हाला माहीत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis DCM Ajit Pawar Press Conference After Cabinate At Marathwada VVP96)

मराठवाड्यात राज्यमंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ ऑक्टोबर २०१६ रोजी मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. तसेच, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

“बऱ्याच वर्षांनी मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक उत्कंठा निर्णयांसंदर्भात आहे. ही बैठक होत असताना विरोधी पक्षातील लोकांनी बैठक होऊ नये असा प्रयत्न केला. या बैठकीतून काय मिळणार असाही प्रयत्न केला. जे स्वत: काहीही करत नाहीत अशी लोक केवळ बोट दाखवण्याच आणि नावं ठेवण्याचं काम करतात”, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. तसेच, काही लोकांनी मागच्या बैठकीत काय झालं असा प्रश्न विचारला होता. त्यांना माझा प्रतिसवाल आहे की, मागील अडीच वर्षात त्यासंदर्भात काही केलं का? असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

- Advertisement -

“४ ऑक्टोबर २०१६ रोजी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या बैठकीत एकूण ३१ निर्णय घेण्यात आले होते. २२ विषय अवघत करण्यात आले होते आणि काही विषयांवर निर्देश झाले होते. या विषयांचा आढावा २०१७ साली घेतला. त्यावेळी १० विषयांवरची कारवाई पूर्ण झाली होती. १५ विषयांवरची कारवाई टप्प्यात होती आणि ६ विषयांची कारवाई अपूर्ण होती. पण आज २०२३मध्ये विचार केला असता ३१ विषयांपैकी २३ विषय पूर्ण झालेले आहेत. सात विषय हे प्रगती पथावर असून एक विषय उद्धव ठाकरे यांच्या काळात व्यपगत झालेला होता”, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“जालन्यामध्ये सीड पार्कच्या संदर्भात ७५ एकर जागा देण्यात आली. त्याचा डीपीआर शासनाकडे होता, पण उद्धव ठाकरेंच्या शासनाने त्यांच्या डीपीआरला मान्यता दिली नाही. पण आपले शासन आल्यानंतर त्याला पुन्हा मान्यता देण्यात आली आणि त्याचे काम सुरू होत आहे”, असेही फडणवीस म्हणाले.

“वॉटर ग्रिड संदर्भात आपण मान्यता दिली होती. आठ पैकी एका जिल्ह्याचे टेंडर काढून कामही सुरू केले होते. परंतु, दुर्देवाने प्रश्न विचारणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने वॉटर ग्रिडचा खून केला. त्याचा मुडदा पाडला. त्यामुळे कशाच्या आधारावर प्रश्न विचारतात हे आम्हाला माहीत नाही. पण आपले सरकार आल्यानंतर ‘हर घर जल’ च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निधी दिला आहे. यासोबतच वॉटर ग्रीडला केंद्र सरकारने मदत करावी असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे”, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – उफ्फ तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श… ANIMATION VIDEO द्वारे काँग्रेसची मोदींवर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -