घरमहाराष्ट्रकोंढवा इमारत दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

कोंढवा इमारत दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

Subscribe

या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोंढवा इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची तर जखमींना २५ हजारांची मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांप्रती देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. पुण्यातल्या कोंढव्यामध्ये इमारतीची संरक्षण भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेचा दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विटही केले. त्यामध्ये त्यांनी या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांप्रती संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

- Advertisement -

पुण्यामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोंढवा परिसरामध्ये इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बडा तलाब मस्जिद परिसरातील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षण भीत कोसळली. मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली असून गाढ झोपेमध्ये असलेल्या मजूरांवर काळाचा घाला घातला आहे.

हेही वाचा – कोंढवा इमारत दुर्घटना प्रकरण; ८ जणांविरोधात गुन्हा दाखल

- Advertisement -

आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. या इमारतीच्या शेजारी दुसऱ्या इमारतीसाठी खोदकाम सुरु होते. संरक्षण भिंतीच्या शेजारीच या इमारतीसाठी बांधकाम करणाऱ्या मजूरांच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. बांधकामासाठी ४० ते ५० फूट खोल खोदकाम करण्यात आले होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अचानक संरक्षण भिंत कोसळून मजूरांच्या झोपड्यांवर कोसळली. त्यामुळे ढिगाऱ्याखाली दबून १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -