घरताज्या घडामोडीअभिजात भाषेचा दर्जासाठी केंद्राशी संघर्ष पण आम्हाला उपकार नको तो आमचा न्याय...

अभिजात भाषेचा दर्जासाठी केंद्राशी संघर्ष पण आम्हाला उपकार नको तो आमचा न्याय हक्क, मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त बोलताना केंद्र आणि मराठी द्वेष्ट्यांवर हल्लाबोल केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रासोबत लढावे लागत आहे. परंतु आम्ही उपकार नाही तर आमच्या हक्काची गोष्ट मागत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपला सुनावलं आहे. तसेच इतर भाषा शिका पण मराठी भाषेचा अभिमान असला पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी

आजचा दिवस मातृभाषेचा गौरव करणार आहे. सकाळपासून मोबाईलमध्ये आलेल्या शुभेच्छा पाहताना भीती वाटत होती. धगधग होत होती कारण भीती होती की, हॅप्पी मराठी डे असे कोणी शुभेच्छा दिली नसेल ना कारण ती एक फॅशन झाली आहे. असे मिश्किल वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. वर्षातून एक असा भाषा दिन येत असतो परंतु वर्षातून एक दिवस नाही तर ज्या भाषेतून आपण बोलत असतो, ज्या भाषेची आपल्याला गरज असते त्या भाषेचा गौरवर दिन एक दिवस असता कामा नये तर त्या भाषेचा गौरव रोज कसा वाढेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

मराठी माणसातील स्वाभिमान जागवण्यासाठी शिवसेनेची स्थापना

ज्या राज्यात आपण जातो त्या राज्यातील भाषेचा आपण मान ठेवला पाहिजे. ज्या वेळी मराठी माणसावर अन्याय होत होता. रोजी रोटी उपलब्ध होत नव्हती त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याच्या मनगटातील ताकद आणि त्याच्यातील स्वाभिमान जागा करण्यासाठी शिवसेनेची स्थापन केली आहे. काही दिवसांपूर्वी सुधीर जोशी यांचे निधन झाले त्यांनी सुद्धा लोकाधिकार समितीची धुरा सांभाळली. अनेकदा म्हटलं आहे या समितीच्या माध्यमातून शिवराय संचलन होत त्यातही मी सहभागी झालो होतो त्यावेळी दृष्य पाहून भारावून जातो. परंतु ही संचलन जाते तो फोर्ट विभाग तिकडे माणसं इमारती, छत, खिडकीमधून लोकं पाहत असतात. तेव्हा मनात विचार आला हेत ते दारे-खिडक्या मराठी माणसांसाठी उघडत नव्हत्या त्याला लोकाधिकार समितीने धडक दिली आणि मराठी माणसांना त्या खुल्या करण्यात आल्या हे कार्य शिवसेनेने केले. पण हे काम करत असताना त्यावेळी संकुचित वादाचा उल्लेख केलाय. ठिक आहे संकुचित असताना इतर भाषेत इतर राज्यात जे काही चालतं.

केंद्रासोबत लढा परंतु उपकार नको

आपण केंद्रासोबत लढतो आहोत की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पाहिजे. हे काही कोणाचे उपकार नको तर आमचा न्याय हक्क आहे. तुम्ही जी काही परीमाणे लावली आहे ती जर मराठी भाषा पूर्ण करत असेल तर मराठी भाषा कोणाचे लुटणारे नाही तर जे हक्काचे आहे ते का सोडू आम्ही? प्रत्येक वेळी मराठी माणसाला संघर्ष करावा का लागतो? मुंबई महाराष्ट्राला मिळाली तर ती मिळाली नाही रक्त सांडून मिळाली. इतर राज्यांना त्यांच्या त्यांच्या भाषेप्रमाणे प्रांत मिळाले त्यांना राजधान्या मिळाल्या ठिक आहे मग मराठीच्या बाबत दुजाभाव का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

प्रत्येकाची मातृभाषा ही त्याच्या आईकडून मिळालेली देणगी

आजसुद्धा मराठी भाषेचा गौरव करत असताना आपल्याला वेगळा अभिमान असला पाहिजे. इतर भाषेचा कमीपणा म्हणत नाही. आपले भाग्य असं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा तीच आपली मातृभाषा आहे. छत्रपती ज्या मातीत जन्मले त्याच मातीत आपण जन्मलो मग त्यांनी जे काही कर्तृत्व दाखवले ते आपण दाखवू शकत नाही. परंतु आपण म्हणतो तुजा कर्तृत्वाचा एक अंश तरी दाखव पण तो अंशच आपल्यामध्ये आलाय की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाची मातृभाषा ही त्याच्या आईकडून मिळालेली देणगी आहे. जी कधी कोणी हिरावून घेऊ शकत नाही अशी देणगी असते. मग तिचा गौरव आपण नाही वाढवणार तर कोण वाढवणार? काही निर्णय आपण शासनाच्या पातळीवर घेतले आणखी काही निर्णय घेणार. मराठी भाषा भवन महाराष्ट्राच्या भूमीवर उभ राहणार त्याची सुरुवात या गुढी पाडव्याला करणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय ही अभिमानाची गोष्ट आहे.

नोकऱ्या मागणारे होऊ नका तर नोकऱ्या देणारे व्हा

मराठी भाषा भवन करणार, मराठी पाट्या करणार पण जे मराठी द्वेष्ट्ये आहेत. जे मुंबईतून सर्व काही मिळवत आहेत. पण त्यांना मराठीचा द्वेष आहे. दुकानावर, अस्थापनावर, मराठी पाट्या असल्याच पाहिजेत पण त्या पाटीच्या मागे काय आहे. याचा अर्थ असा शिवसेना प्रमुखांनी सांगितला आहे की, तुम्ही नुसते नोकऱ्या नोकऱ्या मागणारे होऊ नका तर नोकऱ्या देणारे व्हा. मराठी माणूस नोकरीसाठी फिरतो आहे हे चित्र बदलले पाहिजे. नोकऱ्या देणारे तुम्ही झाले पाहिजे तसेच दुकानावर मराठी पाट्या लावल्या नाही पाहिजेत तर दुकानदार आणि आणखी विभागात मराठी माणसाने शिरले पाहिजे. ज्यावेळी कमी दाबाचा पट्टा होतो तेव्हाच बाहेरून चक्रीवादळ येतं म्हणून जर आपली भूमिका आणि जबाबदारी समर्थपणे पार पाडली पाहिजे.

पुढचा मराठी भाषा दिन भव्य करा

महाराष्ट्रात पुढच्या वर्षीचा मराठी भाषा दिन बंदिस्त हॉलमध्ये न करता मोठ्या मैदानात भव्य दिव्य झाला पाहिजे. दुसऱ्या राज्यातील लोकांनी सुद्धा पाहिजे पाहिजे आणि म्हणाले पाहिजेत किती मोठा भव्य सोहळा यांच्या भाषा दिनाला केला आहे. नाहीतर दरवर्षी एका हॉलमध्ये जमतो. कोरोनामुळे हॉलमध्ये करतो आहोत परंतु पुढच्या वर्षी तो भव्य दिव्य झाला पाहिजे.

नातवंड इंग्रजीमध्ये शिकल्यानं शिवसेना प्रमुखांवर टीका

जगभर मराठी माणसं पसरली आहेत. मी २००९ साली जागतिक मराठी परिषदेला गेलो होतो. छान वातावरण असतं त्या वेळी लोकं कुटुंब एकत्र येतात आणि तो कार्यक्रम साजरी करतात. फार बर वाटलं तिकडे गेलेली लोकं सोहळा साजरा करतात. लहान मुली भारतीय वेषात तयार होऊन आल्या होत्या परंतु त्या इंग्रजीमध्ये बोलत होत्या. मला काही वाईट वाटले नाही पण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे. शेकडो हजारो वर्ष झाली पण यापुढे किती वर्ष होणार? असा प्रश्न पडू द्यायचा नसेल तर आपल्याला घरात मराठी भाषा बोललं पाहिजे. शिवसेना प्रमुखांवर त्या काळी टीका झाली हे मराठी मराठी करतात आणि यांची नातवंड इंग्रजी शाळेत जातात. हो जात होती. इंग्रजी शाळेत दोन्ही मुले शिकत होती. परंतु शिवसेना प्रमुखांनी तेव्हा आम्हा दोघांना बोलवून सांगितले तुमची मुलं इंग्रजी शाळेत जातात परंतु ते घरी आल्यावर त्यांच्याशी मराठीमध्येच बोलले पाहिजे. त्यामुळे आता माझी दोन्ही मुले इंग्रजी, हिंदी बोलतात आणि आपली मातृभाषा आपल्या सारखेच बोलतात याचा मला अभिमान आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले.

भाषेचा द्वेष करु नका पण अभिमान बाळगा

आपण बाहेरच्या देशात गेल्यावर इंग्रजीमध्ये बोलतो. आपल्या देशात उद्योग येत आहेत. त्यामुळे बाहेरचे लोक आपल्याकडे येतील मग ते आपल्याशी मराठीमध्ये बोलणार का? तर नाही ते आपल्यासोबत इंग्रजीमध्येच बोलणार आणि मला स्वतःला आठवत आहे. मी जर्मनीला गेलो होतो माझ्या मित्राची बायको जर्मन होती घरात ती उत्तम इंग्रजी बोलायची तिला विचारले तुम्ही बाहेर का इंग्रजीमध्ये बोलत. त्यावेळी ती रागात म्हणाली तुम्ही इंग्रजांना जर्मनमध्ये का नाही बोलत असे का नाही विचारले. हा एक भाषेचा अभिमान आहे. भाषेचा द्वेष करु नका पण अभिमान जरुर असला पाहिजे. अजोबा सांगायचे इतर भाषा शिका पण आपल्या भाषेचा द्वेष करु नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.


हेही वाचा : गुजरातमध्ये सगळे व्यवसाय करतात तर नोकरी कोण करतं?, राज ठाकरेंचा सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -