घरताज्या घडामोडी७ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयोध्येत!

७ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयोध्येत!

Subscribe

येत्या ७ मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते रामलल्लाचे दर्शन घेतील, त्याचप्रमाणे शरयू नदीतीरावर आरती करतील. अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीटरद्वारे दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर हजारो शिवसैनीक आयोध्येला जाणार असल्याचे संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

 

चलो अयोध्या ..
7 मार्च
मुख्यमंत्री ऊदधव ठाकरे
असंख्य शिवसैनिकांसह अयोध्येत जाणार!
* दुपारी श्रीराम दर्शन
* संध्याकाळी शरयू आरती
ऐतिहासिक सोहोळ्यात सामील व्हा!! असं ट्वीट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -

या आधी २०१८मध्ये पत्नी रश्मी ठाकरे आणि सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारा त्यांचा प्रस्तावित दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -