घरताज्या घडामोडीCNG Price Hike: पुण्यात सीएनजी महागला, जाणून घ्या नवे दर

CNG Price Hike: पुण्यात सीएनजी महागला, जाणून घ्या नवे दर

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह देशभरात इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. त्याचबरोबर सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही मोठी वाढ होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसह देशभरात इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होत आहे. त्याचबरोबर सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही मोठी वाढ होत आहे. नुकताच पुण्यामध्ये सीएनजीच्या दरात वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, 2 रुपये 20 पैशांची वाढ करण्यात आली आहे.

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पीएनजीच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. पुण्यात पुन्हा एकदा म्हणजेच गेल्या दीड महिन्यात तिसऱ्यांदाच सीएनजीच्या दारत वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आल्याने आता सीएनजीचे दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत.

- Advertisement -

नवी दरवाढ आजपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी देखील सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली होती. तेव्हा सीएनजीचे दर 73 रुपयांवरून 75 रुपयांवर पोहोचले होते.

त्यापूर्वी सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 68 रुपयांवरून थेट 73 रुपयांवर पोहोचले होते. आज पुन्हा एकदा दरात दोन रुपये वीस पैशांची वाढ करण्यात आल्याने सीएनजीचे दर 77 रुपये 20 पैसे प्रति किलोवर पोहोचले आहेत.

- Advertisement -

सीएनजीच्या वापराला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सीएनजीच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. तशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यानुसार एक एप्रिलपासून सीएनजीच्या व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात करण्यात आल्याने सीएनजी गॅस प्रति किलोमागे सहा रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र दोनच दिवसांमध्ये कंपन्यांकडून सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली.

एकीकडे आज पुण्यात पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे, मात्र दुसरीकडे राज्यात गेल्या 24 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणारा कर कमी करावा असे आवाहन केंद्र सरकारच्या वतीने राज्यांना करण्यात आले आहे.


हेही वाचा – राज्यात राजकीय सभांचा धडाका, महाराष्ट्रदिनी मनसे आणि भाजपची सभा; तर १४ मे रोजी होणार सेनेची सभा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -