घरदेश-विदेशदिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक; संजय राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा निरोप?

दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक; संजय राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा निरोप?

Subscribe

बैठकीत शरद पवार सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर येत होती. मात्र, शरद पवार अचानक या बैठकीत सहभागी झाले. राज्यातील राजकीय घडामोडी पाहता ही बैठक महत्त्वाची आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. ही बैठक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी होत आहे. या बैठकीअगोदर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती समोर आली होती. एकीकडे बैठकींचे सत्र सुरु असताना दुसरीकडे काँग्रेसचे नेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची बैठक घेतली. अश्विनी कुमार यांनी राऊत यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. अश्विनी कुमार काँग्रेस हायकमांडचा काही निरोप घेऊन गेले होते का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.


हेही वाचा – शिवसेनेसोबत युती करण्यासाठी सोनिया गांधीचा अखेर हिरवा कंदील

- Advertisement -

शरद पवार बैठकीत सहभागी होणार नव्हते

दरम्यान, दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीला राष्ट्रवादीकडून शरद पवार, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, नवाब मलिक तर काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे,अहमद पटेल, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बैठक सुरु आहे. मंगळवारी या बैठकीसंदर्भात माहिती समोर आली होती. या बैठकीत शरद पवार सहभागी होणार नाहीत, अशी माहिती समोर येत होती. मात्र, शरद पवार अचानक या बैठकीत सहभागी झाले. राज्यातील राजकीय घडामोडी पाहता ही बैठक महत्त्वाची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -