घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री, पवार आणि विरोधीपक्षनेत्यांनंतर बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर!

मुख्यमंत्री, पवार आणि विरोधीपक्षनेत्यांनंतर बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर!

Subscribe

गेले काही दिवस राजकीय नेत्यांचा कोकण दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. मात्र यामध्ये काँग्रेसपक्ष कुठेच दिसत नव्हता.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज एक दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत.  या आधी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांच्या कोकण दौऱ्यानंतर आता काँग्रेसचे नेते दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड इथे जाऊन काही तास निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढाव घेतला होता. त्यानंतर शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दोन दिवसांचा कोकण दौरा केला होता.

गेले काही दिवस राजकीय नेत्यांचा कोकण दौरा यावरून राजकारण तापले आहे. मात्र यामध्ये काँग्रेसपक्ष कुठेच दिसत नव्हता. आता अखेरीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आता एकदिवसीय कोकण दौ-यावर आहेत. थोरात हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि चौल येथील नुकसानाची पाहणी करतील. त्यानंतर काशिद आणि मुरुड येथे ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ते महसुल अधिका-यांशी चर्चा करणार आहेत. दिवे आगार, तुरुंवडी इथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन मुंबईकडे परत येणार आहेत.

- Advertisement -

गुरुवारीच बाळासाहेब थोरात यांनी ठाकरे सरकारविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. थोरात यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला महत्त्व दिलं जात नसल्याची तक्रार केली होती. कोकण दौ-यावरून परतलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीबद्दल ही तक्रार होती. या दोन्ही नेत्यांनी कोकणबद्दल केलेल्या चर्चेत काँग्रेस मात्र कुठेच नव्हती. याबाबत थोरात यांनी आपली नाराजी काल जाहीर व्यक्त केलीये. सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल निर्माण झालेले प्रश्न घेऊन काँग्रेसचे सर्व मंत्री आता सोमवारी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.


हे ही वाचा – दिलासादायक! राज्यातील ‘या’ जिल्ह्याने केली कोरोनावर मात!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -