घरCORONA UPDATEकोरोना उपचारामध्ये अ‍ॅझीथ्रोमायसीनचा वापर घातक; औषधाचा वापर थांबवणार?

कोरोना उपचारामध्ये अ‍ॅझीथ्रोमायसीनचा वापर घातक; औषधाचा वापर थांबवणार?

Subscribe

अ‍ॅझीथ्रोमायसीनचा वापर बंद करण्याची शक्यता

कोरोनाबाधितांवर प्राथमिक उपचार करताना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि अ‍ॅझीथ्रोमायसीन या गोळयांचा वापर केला जातो. कोरोनाची सौम्य तसंच कुठलीही लक्षणे नसलेल्या रुग्णांवर या औषधांचा वापर प्रभावी ठरल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र, लवकरच या औषधाच्या वापरामध्ये बदल होऊ शकतो. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच सुधारित मार्गदर्शतत्वे जारी करणार असल्याची शक्यता आहे.

नव्या उपचार पद्धतीमध्ये एचसीक्यू कायम राहिल पण अ‍ॅझीथ्रोमायसीनचा वापर बंद केला जाऊ शकतो. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी ही दोन औषधे सुचवली होती. आयसीएमआरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की एचसीक्यू बरोबर अ‍ॅझीथ्रोमायसीन वापरु नये. कारण यामुळे हृदयाला धोका होऊ शकतो. त्याऐवजी डॉक्सीसायक्लिन (Doxycycline) किंवा अ‍ॅमोक्सीसायक्लिन (amoxycyclin) आणि क्लावुल्यूनिक अॅसिड (Clavulunic Acid) ही औषधं वापरली जावीत. यामुळे हृदयावर कुठलाही परिणाम होत नाही, असंही आयसीएमआरच्या अधिकाऱ्यांनी सांगितली.

- Advertisement -

एम्समध्ये नवीन पद्धत लागू

दिल्लीतील एम्सनेही या नव्या नियमाचं पालन करण्यास सुरवात केली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालय कोरोना रुग्णांवर नव्या प्रोटोकॉलनुसार उपचार करत आहे. उपचारांची नवीन मार्गदर्शतत्वे लवकरच सार्वजनिक केली जाणार आहेत. कोरोनावरील उपचारामध्ये एचसीक्यू गोळीचा वापर कायम राहिल पण अ‍ॅझीथ्रोमायसीनच्या जागी दुसरं औषध दिलं जाऊ शकतं.


हेही वाचा – पुन्हा लॉकडाऊन ही अफवाच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -