घरमहाराष्ट्रआनंद हृदयात मावेना

आनंद हृदयात मावेना

Subscribe

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे काँग्रेस पक्षाची सत्ता आल्यानंतर एका काँग्रेस कार्यकर्त्याला आनंद झाला आहे. या आनंदामुळेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.

प्रत्येक माणसाने जीवनात आनंदी रहाणे गरजेचे आहे. आनंदी राहिल्याने मानसाची जीवनमर्यादा वाढते असे डॉक्टरांचे मत आहे. मात्र अती आनंदीझाल्यामुळे एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्याने अतिआनंदामुळे त्यांना आनंद हृदयात मावेनासा झाला होता. सुरेश सुका ठाकरे (७२) असे या काँग्रेस कार्यकर्त्याचे नाव असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील वंजारी गावात राहात होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना कुटुंबीयांनी स्थानिक रग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्यांना मृत घोषीत करण्यात आले आहे. ठाकरे यांच्या निधनानंतर कुटुंबीयांवर एकच शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल

ठाकरे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात कर्यकर्ता म्हणून काम करत होते. काँग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष होते. निवडणूक निकालाच्या दिवशी टीव्हीवर पाच राज्यांचे निकाल पाहत असाताना काँग्रेसला मिळालेल्या विजयामुळे त्यांना आनंद झाला. त्यानंतर काँग्रेसचे नेते पिरन अनष्ठान यांनी ठाकरे यांना फोन करून विजय उत्सव साजरा करण्यासाठी पारोळा येथे येण्याचा निरोप दिला. तीन राज्यांत काँग्रेसला घवघवीत यश मिळाल्याचं एेकत असतानाच ठाकरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. अचानक आलेल्या झटक्यामुळे घरच्यांमध्ये एकच भितीचे वातावरण होते. त्यांना तत्काळ धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी दुपारपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान तालुका अध्यक्षांचे निधन झाल्यामुळे तालुक्यात साजऱ्या होणाऱ्या आनंदात विरजण पडले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -