Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र झोटिंग समिती हा निव्वळ फार्स होता का? नाना पटोलेंचा सवाल

झोटिंग समिती हा निव्वळ फार्स होता का? नाना पटोलेंचा सवाल

Related Story

- Advertisement -

भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी तत्कालिन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गहाळ झाल्याचं वृत्त आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना झोटिंग समिती हा निव्वळ फार्स होता का? असा सवाल उपस्थित केला आहे. एकनाथ खडसेंना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं होतं का? असा सवाल देखील नाना पटोलेंनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना झोटींग समिती हा एक फार्स होता का? असा सवाल उपस्थि केला आहे. खडसे सारख्या बहुजन समाजाच्या माणसाला बदनाम करण्याचा डाव होता का? हे सगळे प्रश्न त्या माध्यमातून पुढे येत आहेत. जर एखाद्या समितीचा अहवालच जर गायब होत असेल तर खडसेंच्या विरोधात षडयंत्र रचलं होतं असं बोललं तर वावगं ठरणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी नाही

- Advertisement -

नाना पटोले यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातील काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावर बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमध्ये गडबड असल्याचं चुकीचं आहे. काँग्रेस नेत्यांबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. केंद्राने जे देशातील लोकांना लुटायचा प्लॅन केलेला आहे, त्याचा विरोध प्रत्येक टप्प्यावर करण्याचं काँग्रेसने ठरवलं आहे. महागाई विरोधात काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे. येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात रनणीती ठरवली जात आहे, असं नाना पटोले म्हणाले.

फडणवीस हे खोटे बोलणारे मुख्यमंत्री

नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “काल मी त्यावेळेचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेतील भाषण ऐकत होतो. नारायण राणे विधानपरिषदेचे काँग्रेसचे सदस्य होते. त्यावेळी त्यांनी नागपूरच्या मुन्ना यादव संदर्भात भाष्य केलं होतं. फडणवीस सरकार चोरांना कशी साथ यावर भाषण होते. त्यावर उत्तर देताना फडणवीस खोटे बोलले. मुन्ना यादववर राजकीय गुन्हे आहेत, कोणत्याही हत्येचे, बलात्काराचे गुन्हे आहेत, खंडणी गोळा करण्याचे गुन्हे नाहीत, असं फडणवीस यांनी सांगितलं. सर्वांना माहिती आहेत मुन्ना यादववर कोणते गुन्हे दाखल आहेत. या पद्धतीचं खोटं बोलणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

भाजप बहुजनांना वापरुन घेणारा पक्ष

- Advertisement -

नाना पटोले यांनी भाजप हा बहुजनांना वापरुन घेणारा पक्ष आहे, अशी टीका केली. “वस्तूस्थिती आहे की भाजप बहुजनांचे चेहरे वापरतात. बहुजनांच्या हितासाठी लढत असेल तर हे बाजूला करतात. ज्या भाजप पक्षाला गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांना दारोदारी केलं हे आपण पाहतोय. भाजप हा बहुजन विरोधी ओबीसी विरोधी पक्ष हे त्यांच्या कृती मधून दिसतंय,” अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

 

- Advertisement -