घरमहाराष्ट्रराज्य सरकार साधणार शेतकर्‍यांशी ‘संपर्क’

राज्य सरकार साधणार शेतकर्‍यांशी ‘संपर्क’

Subscribe

राज्यभरात वाढत असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने आता गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार राज्य सरकारतर्फे शेतकर्‍यांचे समुपदेशन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार राज्यभर संपर्क यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली आहे. या निर्णयानुसार वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

राज्यासह देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसायात अनेक दिवसांपासून शेतकरी आत्महत्येचे ग्रहण लागले आहेत. आत्महत्येचे वाढते प्रमाण वाढण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक पावले उचलण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर आता राज्य सरकारने एक नवे पाऊल उचलत राज्यभरात संपर्क यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार राज्यातील दुष्काळग्रस्त, नापिकग्रस्त भागात संपर्क यात्रा काढण्यात येणार असून याची जबाबदारी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनकडे सोपविण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकर्‍यांना समुपदेशन आणि त्यांचे प्रबोधन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करताना नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना करताना त्याची जबाबदारी किशोर तिवारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, राज्य सरकारने जाहीर केलेली ही संपर्क यात्रा वाशिम, अकोला, बुलढाणा आणि वर्धा याठिकाणी भेट देणार आहे. ८ फेब्रुवारीपासून या संपर्क यात्रेस सुरुवात होणार असून १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा अकोला येथे भेट देणार आहे. त्यानंतर बुलढाणा आणि वर्ध्याला अनुक्रमे २१ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी रोजी ही यात्रा जाणार असल्याचे राज्य सरकातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -