घरताज्या घडामोडी'नगरमधला करोनाग्रस्त ठणठणीत'! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

‘नगरमधला करोनाग्रस्त ठणठणीत’! जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Subscribe

नगरमध्ये आढळलेला एकमेव करोनाग्रस्त रुग्ण आता ठणठणीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे.

करोनाची लक्षणे आढळलेल्या संशयित १७ पैकी ८ रुग्णांच्या तपासणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यापैकी एकाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. उर्वरित संशयितांचेदेखील अहवाल संध्याकाळपर्यत प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, नगरमध्ये आढळून आलेला एकमेव करोनाचा रुग्ण ठणठणीत असल्याचं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. करोना पाठोपाठ आता नगरमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्णदेखील समोर येऊ लागले आहेत. जगभर थैमान घालणाऱ्या करोनाने बाधित एक रुग्ण नगरमध्ये पॉझिटिव्ह सापडल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी आणि उपाय योजनांना सुरुवात केली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील शाळा, महाविद्यालये, वसतीगृहे, सिनेमागृहे, शासकीय कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरी बंद केली आहे. तसेच पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली आहे.

आठही संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

दरम्यान, नगरमध्ये करोनाची लक्षणे आढळून आलेल्या सतरा जणांचे नमुने पुण्यातील संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनावरील ताण जरासा हलका झाला.

- Advertisement -

उर्वरित अहवाल लवकरच येणार

परदेशातून विशेषत: दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. महापालिका नगरपालिका नगरपंचायत क्षेत्रातील खाजगी क्लासेस बंद न केल्यास क्लास चालकांवर देखील गुन्हे दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. लग्न समारंभास बंदी नसली तरी नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन करत प्रांताधिकारी, तहसिलदारांना यासंबधीचे निर्देश देण्यात आले आहे. आंदोलने, उपोषणासदेखील पुढील आदेश येईपर्यत बंदी घातली गेली आहे. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. कर्जमाफीच्या केंद्रावर, एटीएम सेंटर, बॅकामध्ये सॅनिटरी नॅपकीन ठेवण्यात आले आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयामध्ये २७ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आठ अहवाल आले असून उर्वरित अहवालदेखील लवकरच मिळतील, असे त्यांनी सांगितले.

नगरमधला रुग्ण ठणठणीत

दरम्यान, करोनाची लागण झालेला नगरमधील एकमेव रुग्णदेखील ठणठणीत असून त्याच्यात अद्यापही सर्दी, खोकला, ताप अशी कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्यामुळे या रुग्णावरील उपचार बंद असून आता त्याचे समुपदेशन सुरु असल्याचे पुढे आले आहे. बुथ रुग्णालयात विलगीकरण कक्षात या रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून दिवसातून दोनदा त्याची तपासणी केली जात आहे. टीव्ही बघणे आणि वाचन करणे असा या रुग्णाचा दिनक्रम आहे. एकाच जागेवर झोपून, अथवा बसून राहिल्याने त्याची मानसिक स्थिती खालावण्याची शक्यता लक्षात घेत त्याच्या समुपदेशनावर भर दिला जात असल्याचे पुढे आले आहे.


CoronaVirus : पुढचे २ आठवडे आपल्यासाठी महत्त्वाचे-मुख्यमंत्री
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -