घरमहाराष्ट्रभिवंडीत ऑक्सिजन पुरवठा वेळेत न केल्याने कोरोना रुग्ण महिलेचा मृत्यू

भिवंडीत ऑक्सिजन पुरवठा वेळेत न केल्याने कोरोना रुग्ण महिलेचा मृत्यू

Subscribe

महिलेच्या हत्येस रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला

भिवंडी शहरातील इंदिरा गाांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या कोव्हिड रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा वेळेत न झाल्याने रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला. या महिलेच्या हत्येस रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ते भिवंडीतील शासकीय रुग्णालयास भेटी दरम्यान पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या सोबत भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, आमदार महेश चौघुले, शाम अग्रवाल, प्रा डॉ सुवर्ण रावळ, विनोद भानुशाली आदी पदाधिकारी उपस्थित होते.

भिवंडी शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मृत्यूची संख्या ११ वर पोहचली आहे. दोन दिवसांपूर्वी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण महिलेस ऑक्सिजनचा वेळेवर पुरवठा होऊ न शकल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने येथील रुग्णालयातील व्यवस्था तकलादू असल्याचे सिद्ध होत आहे. त्यामुळे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रुग्णालयास भेट देत या महिलेचा मृत्यू ही हत्या असून त्यास रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

भिवंडी शहरातील गोपाळ नगर परिससरात राहणाऱ्या पतिपत्नी यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना आयजीएम कोव्हिड रुगणालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दरम्यान ५५ वर्षीय महिलेचा ३१ मे रोजी दुर्दैवी अंत झाला परंतु रुग्ण महिलेस ऑक्सिजन चा पुरवठा न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून सुरू झाला. या घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नुकताच आयजीएम हॉस्पिटल व पालिका मुख्यालयास भेट देत वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिल थोरात व आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली. या चर्चेदरम्यान रुगणालायत २० व्हेंटिलेटरची गरज असून सध्या फक्त ४ उपलब्ध असल्याची महिती डॉ अनिल थोरात यांनी दिली


घाबरु नका; सरकारच्या सुचनांचं पालन करा – सुप्रिया सुळेंची जनतेला विनंती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -