घरCORONA UPDATECorona Strict Restriction : राज्यात नाईट कर्फ्यू, लोकल प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच,...

Corona Strict Restriction : राज्यात नाईट कर्फ्यू, लोकल प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच, राज्याची नवीन नियमावली जाहीर

Subscribe

राज्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि वेगाने वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्यात गेल्या २४ तासात ४१ हजार ४३४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच आणखी कोरोनाबाधितांची नोंद होऊ नये यासाठी राज्य सरकारने राज्यात रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनाच फक्त लोकलने प्रवास करता येणार आहे. शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा तसेच सार्वजनिक वाहतूकीसाठी दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी देण्यात आली आहे.

लग्नसमारंभासाठी ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली आहे. तसेच अंत्यविधीसाठी २० तर इतर कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीची परावनगी देण्यात आली आहे. राज्यात दिवसाची जमावबंधी लागू करण्यात आली आहे तर रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीमध्ये ज्या नागरिकांनी दोन लसीचे डोस घेतले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

लोकल प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परावनगी देण्यात आली आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांना दोन लसीचे डोस घेणं बंधनकारक आहे. दोन लसीचे डोस घेतलेल्यांना आणि ज्यांच्याकडे युनिव्हर्सल पास आहे. अशा नागरिकांनाच लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. राज्य सरकारने लोकल प्रवासावर निर्बंध आणताना अत्यावश्यक सेवेतील प्रकार आणि अस्थापनांची संख्या वाढवली आहे. रात्रभर काम सुरु असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या यादीत टाकलं आहे.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जारी

रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचार बंदी /नाईट कर्फ्यू
मैदान, उद्यान, पर्यटन स्थळ बंद
स्विमींग पूल, स्पा, जीम पूर्ण बंद
शाळा कॉलेज १५ तारखेपर्यंत बंद
हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के आसनव्यवस्था बंधनकारक
सार्वजनिक वाहतूकीसाठी दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी
थिएटर ५० टक्के क्षमतेने सुरु राहणारसलून ५० टक्के क्षमतेने चालू राहणार परंतु कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने बंद राहतील.
सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना ५० लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल.
अंत्यविधीसाठी २० लोकांना उपस्थित राहता येणार आहे.
लग्न समारंभात ५० लोकांना उपस्थिती असेल.
रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कोणालाही प्रवास करता येणार नाही.

- Advertisement -

स्पर्धा परीक्षांना असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना हॉल तिकीट दाखवून प्रवास करण्याची मुभा असेल.
तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटना रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉटेलमध्ये २ लसीचे डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. होम डिलीव्हरी सेवा पूर्णवेळ असेल


हेही वाचा : Mumbai corona Update : मुंबईत २० हजारपेक्षा अधिक कोरोना बाधित रूग्ण नोंदीची हॕट्रिक, ५ रुग्णांचा मृत्यू

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -