घरमहाराष्ट्रराज्याला दिलासा, कोरोनाबाधितांची संख्या घटली; तीन हजारांपेक्षाही कमी सक्रिय रुग्ण

राज्याला दिलासा, कोरोनाबाधितांची संख्या घटली; तीन हजारांपेक्षाही कमी सक्रिय रुग्ण

Subscribe

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात फक्त १८० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिलासादायक म्हणजे एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. रविवारी ३७९ नवे कोरोना रुग्ण सापडले होते. त्यातुलनेत आज रुग्णसंख्या घटली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १८० नवे रुग्ण सापडले असून ३५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत 79,71,346 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आता रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९८.१४ टक्के झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे, आज एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर 1. 82 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात २ हजार ७३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी पुण्यात ८२६ रुग्ण असून मुंबईत ७१४ आहेत.

- Advertisement -

देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ११ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशभऱात रुग्णसंख्येत घट झालेली असली तरीही मृत्यूसंख्येत वाढ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -