घरमहाराष्ट्रशिवाजी पार्कवर महाविकास आघाडीचा मेळावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीचा मेळावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

Subscribe

मुंबई : शिवसेना आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन सुरु आहे. या तयारीत दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून खिल्ली उडवली आहे. बीकेसी मैदानावर होणारा आमचा मेळावा हा शिंदे गटाचा दसरा मेळावा नसून तो खरा शिवसेनेचा मेळावा आहे. तर शिवाजी पार्कवरचा मेळावा हा महाविकास आघाडीचा दसरा मेळावा आहे, अशा शब्दात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेच्या मेळाव्यावर टीका केली आहे.

उदय सामंत यांनी आज बीकेसी मैदानावर येऊन दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केली.यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचा नव्हे तर शिवसेनेचा खरा दसरा मेळावा आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून शिवसेनेला मदत मिळत असून रविवारी त्यांच्या गटातील नेते हे भारत जोडो अभियानाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे त्यांचा होणारा हा दसरा मेळावा हा शिवसेनेचा नव्हे तर महाविकास आघाडीचा मेळावा आहे, असे सामंत म्हणाले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकांवर बोलणे टाळले. निवडणूक आयोगाच्या संदर्भात मी काही बोलणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमचीच खरी शिवसेना असून आमचा अभूतपूर्व असा मेळावा होणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.


मुंबईकरांसाठी कल्याणकारी, नावीन्यपूर्ण व आधुनिक उपक्रम राबविणार -: मंत्री केसरकर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -