घरमहाराष्ट्रकोरोनाचा धोका वाढतोय, राज्यात ४०० हून अधिक नवे रुग्ण; तुमच्या शहराची स्थिती...

कोरोनाचा धोका वाढतोय, राज्यात ४०० हून अधिक नवे रुग्ण; तुमच्या शहराची स्थिती काय?

Subscribe

Corona Update From Maharashtra |केंद्र आणि राज्य सरकारने अवलंबलेल्या अनेक धोरणांमुळे आणि लसीकरणामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले होते. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून हा आकडा ३०० ते ४०० च्या घरात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Corona Update From Maharashtra | मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून राज्यासह देशातील कोरोना संसर्ग कमी झाला होता. केंद्र आणि राज्य सरकारने अवलंबलेल्या अनेक धोरणांमुळे आणि लसीकरणामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यश मिळाले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. २८ मार्च रोजी राज्यात एकूण ४५० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून हा आकडा ३०० ते ४०० च्या घरात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्या २४ तासांत ४५० नवे कोरोना रुग्ण सापडले असून ३१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९८.१५ टक्के आहे. तर, गेल्या २४ तासांत ३ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण (Death Rate) १.८२ टक्के झाले आहे. तर, राज्यात सध्या २३४३ रुग्णांवर (Active Patients) उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत मुंबईत १३५, ठाणे शहर ८, ठाणे महानगरपालिका २५, नवी मुंबई महानगर पालिका १८, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ३ रुग्ण सापडले आहेत. तर, राज्यात सध्या २३४३ सक्रीय रुग्ण असून मुंबईत ६६३, ठाणे ४२९, पालघर २८, रायगड ७५, रत्नागिरी २२, सिंधुदुर्ग ७, पुणे ६०४ इत्यादी सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात कोरोनासह XBB 1.16 या नव्या व्हेरियंटचाही संसर्ग झपाट्याने होत आहे. आतापर्यंत या विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या २३० झाली आहे. यापैकी १५१ रुग्ण पुण्यातील असून, २४ रुग्ण औरंगाबाद, ११ रुग्ण कोल्हापूर, ११ रुग्ण अहमदनगर, ८ रुग्ण अमरावती आणि १ रुग्ण मुंबई आणि रायगड येथील आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर इतर रुग्णांनी संसर्गावर यशस्वी मात केली आहे. या सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे होती. बाधित रुग्णांच्या परिसरातील चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

विमानतळांवर तपासणी सुरू

वाढत्या कोरोना आणि XBB 1.16 व्हेरियंट विषाणूमुळे मुंबई, पुणे आणि नागपूर विमानतळावर उतरणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या तिन्ही विमानतळांवर १५ लाख ८९ हजार ४१८ आंतरराष्ट्री प्रवाशांचं आगमन झालं असून यांच्यापैकी ३५ हजार ३६३ रुग्णांची RT-PCR चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ४३ रुग्णांच्या चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -