घरमहाराष्ट्रकोरोना लशीची टंचाई पुढचे सहा महिने राहणार - अदार पूनावाला

कोरोना लशीची टंचाई पुढचे सहा महिने राहणार – अदार पूनावाला

Subscribe

भारतीयांना पहिल्या टप्प्यात मिळणार ५ कोटी डोस

जगातील सर्वात मोठ्या लस निर्माती कंपनी असलेल्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) ने ऑक्सफर्ड – अस्ट्राझेनेका कोरोना व्हायरस लशीबाबतची मोठी घोषणा केली आहे. येत्या काही दिवसांमध्येच आम्ही आपत्कालीन वापरासाठीची परवानगी ही सरकारकडून मिळेल अशी अपेक्षा करत आहोत असे सीरमकडून सांगण्यात आले. कंपनीकडे सध्या ४ कोटी ते ५ कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात डोस आहेत. तर १० कोटी लस निर्मितीची कंपनीची क्षमता असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. मार्चअखेरीपर्यंत १० कोटी लशींची निर्मिती करणे हे नव्या सुविधांच्या उपलब्धततेमुळे शक्य होईल असे सीरम इंस्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांनी सांगितले.

सध्या आमच्याकडे ४ कोटी ते ५ कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या लशी उपलब्ध आहेत. आम्हाला जेव्हा नियामकाकडून परवानगी मिळेल तेव्हा आम्ही सरकारच्या गरजेनुसार आणि तितक्यात वेगाने लशीची निर्मिती करू शकू असे सीरमचे मुख्यम कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (adar poonawala) यांनी सांगितले. कोरोनाशी संबंधितीत सर्व माहिती ही इंग्लंड आणि भारतात दाखल करण्यात आली आहे. तसेच नियामकामार्फत सर्व माहिती, डेटाबेस आणि कागदपत्रे ही पडताळणीच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. भारत हा कोवॅक्सचा (COVAX) भाग आहे. त्यामुळे भारतात जितक्या लसी तयार होतील, त्यापैकी अर्ध्या लसी या भारतातच देण्यात येतील. भारतातील लोकसंख्या पाहता भारताला सुरूवातीच्या टप्प्यातच ५ कोटी इतक्या प्रमाणात लसी पुरवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. तसेच सीरमकडून जुलै २०२१ अखेरीपर्यंत आणखी ३० कोटी डोस तयार करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. इंग्लंडमधूनही लवकरच चांगली बातमी मिळू शकते असेही संकेत त्यांनी यावेळी दिले.

- Advertisement -

सध्या इंग्लंड, अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू झाले असले तरीही जगभरात पहिल्या सहा महिन्यात कोरोनाच्या लशीची टंचाई भासणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पण या लसीच्या टंचाईसाठी कोणीच काहीच करू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ऑगस्ट सप्टेंबर नंतर मात्र कोरोना लस तयार करणाऱ्यांनाही या लसीचा पुरवठा सुलभतेने करता येईल असे ते म्हणाले. भारतातच ६० कोटी कोरोनाच्या लसी या येत्या सहा ते आठ महिन्यांमध्ये देण्यात येतील. भारतातील नियामकाकडून Pfizer आणि भारत बायोटेकच्या लसीसाठी येत्या दिवसात परवानगी मिळणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या लसीसाठी मात्र प्राधान्य हे भारतालाच असेल असेही पूनावाला यांनी स्पष्ट केले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -