घरमहाराष्ट्रराज्यातील करोना रुग्णाने ओलांडला लाखांचा आकडा

राज्यातील करोना रुग्णाने ओलांडला लाखांचा आकडा

Subscribe

राज्यात ३४९३ नवे रुग्ण, १२७ जणांचा मृत्यू

राज्यात शुक्रवारी ३४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १,०१,१४१ झाली आहे. करोना रुग्णांनी ओलांडलेला लाखांचा आकडा हा राज्य सरकारसाठी चिंतेची बाब ठरत आहे. शुक्रवारी १२७ जणांचा करोनाने मृत्यू झाला असून मृतांची संख्या ३७१७ वर पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात १७१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याने आजपर्यंत ४७,७९६ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात १२७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबई ९०, ठाणे ११, कल्याण-डोंबिवली ३, वसई-विरार १, मीरा-भाईंदर १, नाशिक २, धुळे १, पुणे १२, सांगली ३, औरंगाबाद २, अमरावती १ असे मृत्यू झाले आहेत. मृत्यूंपैकी ९२ पुरुष तर ३५ महिला आहेत. शुक्रवारी नोंद झालेल्या १२७ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६७ रुग्ण आहेत तर ५२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ८ जण ४० वर्षांखालील आहे. या १२७ रुग्णांपैकी ८९ जणांमध्ये ( ७० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २० मे ते ९ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५५, ठाणे १०, सांगली ३, कल्याण-डोंबिवली २, पुणे २, मीरा-भाईंदर १, वसई-विरार १, नाशिक १, धुळे १ आणि अमरावती १ मृत्यू असे आहेत.

- Advertisement -

राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६,२४,९७७ नमुन्यांपैकी १,०१,१४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के) आले आहेत. सध्या राज्यात ५,७९,५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,०६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८,२०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -