घरताज्या घडामोडीसावधान! तुमच्या शेजारीही असू शकतो कोरोनाग्रस्त रुग्ण

सावधान! तुमच्या शेजारीही असू शकतो कोरोनाग्रस्त रुग्ण

Subscribe

खोकला, घसा खवखवणे आणि तीव्र ताप ही कोरोनाची लक्षणे असली तरी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असलेल्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसण्यास किमान पाच दिवसांचा कालावधी लागतो. तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे यापुढे बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना सुदृढ वाटणारी व्यक्तही कोरोनाबाधित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात जाताना सोशल डिस्टनसिंगची अंमलबजावणी करा अन्यथा आपल्या शेजारीही कोरोनाग्रस्त व्यक्ती उभा असू शकतो अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

२० ते ४० वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण अधिक

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न होताना दिसत आहेत. भारत सध्या कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. यामध्ये समाजातील लोकांकडून समाजातील लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार होऊन त्याचा नेमका स्रोत शोधणे फार अवघड असते. अशावेळी काळजी घेणे फार महत्त्वाचे असते. परंतु अद्यापही नागरिकांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्य नसल्याने कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. दोन दिवसांत मुंबईचा आकडा दुपटीने वाढला असून राज्याचा आकडाही त्याच वेगाने वाढत आहे. अन्य देशांमध्ये वृद्धांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक असताना भारत आणि महाराष्ट्रात २० ते ४० वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण अधिक झाल्याचे दिसून येत आहे. या वयोगटातील व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असल्याने त्यांच्यामध्ये पटकन कोरोनाचे लक्षण दिसून येत नाहीत. एखाद्या सुदृढ व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसण्यासाठी किमान पाच दिवस लागतात. या कालावधीत हा रुग्ण अनेक ठिकाणी संचार करत असल्याने तो कोरोनाचा प्रसार वेगाने करत असतो. त्यामुळे तुमच्या शेजारी उभा असलेला धष्टपुष्ट व्यक्तीही कोरोनाबाधित असू शकतो. त्याची रोगप्रतिकार शक्ती उत्तम असल्याने तो कोरोनाबाधित आहे असे वाटत नसले तो कोरोना विषाणूंचा वाहक असू शकतो. तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीने बाजारात जाताना काळजी घेत सोशल डिस्टनसिंग राखणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. तसेच काही दिवस घरातच राहण्यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये पाच दिवसानंतर लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. लक्षणे दिसल्यावरच नागरिक चाचणी करून घेतात. मात्र तोपर्यंत ती व्यक्ती सर्वत्र फिरत असेल तर कोरोनाचा प्रसार होतो. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्याबरोबरच स्वतः ला घरात बंद करून घेणे आवश्यक आहे. – शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलिंग


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईत कोरोना बाधितांमध्ये वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ परिसर आघाडीवर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -