घरCORONA UPDATECoronaVirus: मुंबईत कोरोना बाधितांमध्ये वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ परिसर आघाडीवर

CoronaVirus: मुंबईत कोरोना बाधितांमध्ये वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ परिसर आघाडीवर

Subscribe

वरळी, भायखळ्यासह चिंचपोकळीतच अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. वरळीत आणखी १० कोरोनाचे रुग्ण वाढले असून एकाच दिवशी भायखळा, चिंचपोकळीत २५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत कोरोनाग्रस्तांची दिवसेंदिवस वाढत असून वरळी, प्रभादेवी या ‘जी-दक्षिण’ विभागात आणखी १० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. रविवारीही पॉझिटिव्ह रुग्णांच्या क्रमवारीत ‘जी-दक्षिण’ विभाग पहिल्याच क्रमांकावर राहिलेला आहे. त्यामुळे ‘जी-दक्षिण’ विभागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. तर शनिवारी पाचव्या क्रमांकावर असलेल्या भायखळा, चिंचपोकळी या ‘ई’ विभागाने एकाच दिवशी २५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. १९वर असलेल्या या विभागात रविवारी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झटकन ४४वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईतील वरळी, प्रभादेवी आणि भायखळा, चिंचपोकळी हे विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.

वरळी, लोअर परळ विभाग आघाडीवर

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या विविध उपाययोजना केल्या जात असून मुंबईतील प्रत्येक भागांमध्ये आता कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येत आहे. मागील आठवड्यात चेंबूर-देवनार या ‘एम-पश्चिम’ विभाग आघाडीवर होता. परंतु या आठवड्यात वरळी, लोअर परळ हा ‘जी-दक्षिण’ विभागात कोरोना रुग्णांचा आकडा वाढलेला आहे. ‘जी-दक्षिण’ विभागातील वरळीत कोळीवाडा, जनता नगर, जिजामाता नगर, पोलीस वसाहत, आदर्श नगर, प्रभादेवी रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी ५ एप्रिलपर्यंत ६८ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे चिंचपोकळी, भायखळा या ‘ई’ विभागात काही दिवसांपूर्वी वाढलेली संख्या शनिवारपर्यंत नियंत्रणात आल्यासारखे वाटत होते. परंतु रविवारपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार या विभागात १९ वरून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४४ एवढी झाली आहे. तर ‘के-पश्चिम’ या विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम विभागात एकाच दिवशी १२ रुग्णांची संख्या वाढली आहे. या विभागात शनिवारपर्यंत २५ रुग्ण होते. परंतु त्यात वाढ होऊन ही संख्या ३७वर पोहोचली आहे.

- Advertisement -

याशिवाय मलबार हिल, मुंबई सेंट्रल ग्रँटरोड या ‘डि’ विभागात ३ ने संख्या वाढून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३४ तर विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या ‘के-पूर्व’ विभागात २ ने संख्या वाढून पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २६ वर पोहोचली आहे.

५ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची वॉर्डनिहाय आकडेवारी

सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून पहिले पाच वॉर्ड

- Advertisement -

जी-दक्षिण (वरळी, प्रभादेवी, लोअर परळ) : ६८

ई (भायखळा,चिंचपोकळी) : ४४

के-पश्चिम (विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम) : ३७

डि, (मलबार हिल,ग्रँटरोड) : ३४

के-पूर्व, (विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व) : २६

पॉझिटिव्ह रुग्णनिहाय वॉर्डांची नावे

२० पेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची ठिकाणे : जी-दक्षिण, ई, डि, के-पूर्व, के-पश्चिम,पी-उत्तर,एम-पश्चिम, एच- पूर्व

११ ते २० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेली ठिकाणे : एन, एम-पूर्व, एम-पश्चिम,एस, आर-दक्षिण, टी, ,

१० पर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले वॉर्ड : सी, पी-दक्षिण, ए, एल, एफ-उत्तर, आर-उत्तर, आर-मध्य, जी-उत्तर, एफ-दक्षिण, बी


हेही वाचा – CoronaVirus: राज्यातील कोरोना चाचणी प्रयोगशाळांची यादी जाहीर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -