घरCORONA UPDATECorona Live Update: केडीएमसीत आज सर्वाधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Corona Live Update: केडीएमसीत आज सर्वाधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

Subscribe
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गुरुवारी सर्वाधिक ५६० नवीन रूग्ण आढळून आले. गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक रुग्ण संख्या असल्याने कल्याण डोंबिवलीकरांची चिंता अधिकच वाढली आहे.

केडीएमसीत दिवसागणिक रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. शंभर रुग्णसंख्येवरून हा आकडा गुरुवारी थेट पाचशेपार झाला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २ जूलैपासून दहा दिवसाचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५६० रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. तसेच २४ तासात ४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा ७ हजार ४७५ झाला असून मृतांची संख्या १२७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३०९० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ४२६८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राज्यात मागील २४ तासांत ६ हजार ३३० नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १२५ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ८६ हजार ६२६वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार १७८ झाला आहे.


आज ठाणे महापालिका क्षेत्रात ३९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या एकूण ९ हजार ५३० झाली आहे.

- Advertisement -

दादरमध्ये आज १२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा ८८७वर पोहोचला आहे. तसेच माहिममध्ये आज २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा १ हजार १५६वर पोहोचला आहे.


आज मुंबईत १ हजार ५५४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८० हजार २६२वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ४ हजार ६८६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच आज मुंबई ५ हजार ९०३ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५० हजार ६९४ रुग्ण बरे झाले आहेत. सविस्तर वाचा

- Advertisement -

आज धारावीत १९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा २ हजार ३०१वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ८४ जणांचे मृत्यू झाले आहेत. तसेच सध्या ५५१ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.


कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता कल्याण डोंबिवलीत १२जुलै पर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने या लॉकडाऊन निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवत गुरुवार पासून नाका बंदी करीत फक्त अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना सोडत, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मज्जाव करीत लॉकडाऊनच्या दुष्टीकोनातून कडक पाऊल उचल्याचे मनपा परिसरात चित्र दिसत आहे.

सकाळ पासून शहाड मुरुबाड डायव्हरशन पुलाजवळ नाक्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तापसणी केली जात असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कल्याण मधील मुख्य बाजारपेठ, स्टेशन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर, जुनी बाजारपेठ रोड, टिळक चौक, बेतूरकर पाडा, खडकपाडा, उंबर्डे, आधारवाडी, लालचौकी, गोदरेज हिल, बिर्ला कॉलेज रोड, कर्णिक रोड, रामबाग, आग्रा रोड, टिटवाळा, मोहने, आंबिवली स्टेशन परिसर, अटाळी, वडवली, गाळेगाव, जेतवननगर, बल्याणी आदी महत्त्वाच्या परिसरात लॉकडाऊन मुळे दुकाने बंद होती. नागरिक देखील घराबाहेर न पडता लॉकडाऊनचे पालन करीत असल्याचे चित्र दिसत होते. तर फक्त दवाखाने, औषधे दुकाने लॉकडाऊन मध्ये उघडी होती. भाजीपाल्याच्या हातगाड्या, फळाच्या हातगाड्या देखील रस्त्यावर दिसत नव्हत्या.

गेल्या २४ तासांत देशात ११ हजार ८८१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ३ लाख ५९ हजार ८५९ रुग्ण बरे झाले आहे. सध्या २ लाख २६ हजार ९४७ रुग्णांवर उपाचर सुरू असून सर्व जण वैद्यकीय देखरेखीखाली आहे, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.


भिवंडी शहरात बुधवारी ८२ तर ग्रामीण भागात ८८ नवे रुग्ण आढळून आल्याने तालुक्याची एकत्रित रुग्ण संख्येने ३ हजार पार केला आहे. भिवंडी शहरातील रुग्ण संख्या २ हजार २३ तर ग्रामीण भागातील १ हजार ५२ रुग्ण संख्या झाली असून बुधवारी शहरात ३ तर ग्रामीण भागात ६ रुग्णांचा मृत्यु झाल्याने रुग्णसंख्या अनुक्रमे ११२ आणि २२ मिळून १३४ झाली आहे. तर अजूनही शहरातील १ हजार २० तर ग्रामीण मधील ८७९ असे एकूण १ हजार ८९९ रुग्ण उपचार घेत आहेत तर बुधवारी शहरातील ७२ रुग्णांना डिस्चार्ज दिल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ८९१ व ग्रामीण ची १५१ अशी एकत्रित १ हजार ४२ झाली आहे.

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय रुग्णसंख्या पाहिल्यास सुरुवातीपासून खारबाव, कोनगाव, अंजुर येथील रुग्णसंख्या अधिक असून खारबाव ३०, अंजुर २४, कोनगाव १५, अनगाव १०, पडघा ४, चिंबीपाडा ३, दाभाड २ असे रुग्ण आढळेल असून काल्हेर येथे दोन तर कारीवली, कालवार, राहनाळ, कांबा या गावात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत देशात ९० लाख ५६ हजार १७३ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात १ हजार ६५ लॅब असून त्यापैकी ७६८ लॅब सार्वजनिक क्षेत्राच आणि २९७ लॅब खासगी क्षेत्रात आहेत. काल २ लाख २९ हजार ५८८ लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती भारत सरकारने दिली आहे.


कोविड -१९ विरूद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांचे टास्क फोर्स नेमण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क नियुक्त केले जाणार असून प्रत्येक जिल्हात नियुक्त करण्यात येणार्‍या या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ यांचा समावेश करण्यात येणार आहे.


देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशात १९ हजार १४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४ हजार ६४१ वर पोहोचली असून मृतांची संख्या १७ हजार ८३४ झाली आहे. तसेच २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून ३ लाख ५९ हजार ८६० जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवसात आढळून आले ४७ पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवसात ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा रूग्णालय १७, कळंबणी (खेड) १३, दापोली ग्रामीण रूग्णालय १२, कामथे (चिपळूण) उपजिल्हा रूग्णालय आणि संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय प्रत्येकी २ आणि मंडणगड येथील १ रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६६१ इतकी झाली आहे


देशात आतापर्यंत ९० लाख ५६ हजार १७३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २ लाख २९ हजार ५८८ जणांची काल बुधवारी चाचणी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिली आहे.


ठाणे जिल्हा क्षेत्रात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करुन विशेष फरक पडणार नाही. यामुळे ठाणे जिल्हयातील महानगरपालिकांचे क्षेत्र वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद, नगर पंचायत आणि ग्रामीण क्षेत्रात २ जुलै रोजी रात्री १२ वाजल्यापासून ११ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अतिरिक्त प्रतिबंध आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लागू केले आहेत.

शासनाने नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी संपूर्ण राज्यभरात वेळोवेळी लॉकडाउनची घोषणा, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू केले आहेत. तसेच या लॉकडाउन आदेशांना वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली आहे.


राज्यात बुधवारी ५५३७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ८० हजार २९८ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण ७९ हजार ७५ झाले आहेत. राज्यात १९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ८०५३ वर पोहोचली आहे.

राज्यात नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १२९ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. मृत्यूंमध्ये मुंबईतील ६९, मीरा भाईंदर २६, ठाणे मनपा १७, कल्याण डोंबिवली ४, जळगाव ३, पुणे ३,नवी मुंबई १, उल्हास नगर १, भिवंडी १, पालघर १, वसई विरार १, धुळे १ आणि अकोला १ यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -