घरमहाराष्ट्रधक्कादायक: COVID Care Centre च्या कर्मचाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग!

धक्कादायक: COVID Care Centre च्या कर्मचाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग!

Subscribe

पुण्यातील सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमधील महिला रूग्णाचा विनयभंग झाल्याचे आढळून आले आहे.

राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमधील महिला रूग्णाचा विनयभंग झाल्याचे आढळून आले असून या महिलेचा विनयभंग करणारा चक्क व्यक्ती हा कोविड सेंटरचा कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे.लोकेश मते असे या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार महिलेकडून FIR दाखल

विनयभंग करणारा आरोपी व्यक्ती याच कोविड सेंटरमधील कर्मचारी असून त्याने आपला मोबाइल नंबर घेऊन मेसेजही केला आणि रात्री १२ वाजता रुमचा दरवाजाही वाजवला असे तक्रारदार महिलेने दाखल केलेल्या FIR मध्ये सांगितले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

असा घडला प्रकार

पुण्यातील सिंहगड कॉलेज कोविड सेंटरमध्ये सोमवारी राञी १२ वाजता एका महिला रुग्णाचा दारवाजा जोरदार ठोठावल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान संबंधित महिलेने घाबरून १०० नंबरवर कॉल करून तक्रारही केली पण पोलिसांकडे पीपीई कीट नसल्याने त्यांनी कोविड सेंटरमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवारी या पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या महिलेची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था जरी करण्यात आली असली तरी कोविड सेंटरमधील महिला रूग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजमध्ये असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये मध्यरात्री २७ वर्षीय कोरोना बाधित महिला राहत असलेल्या रूमचा दरवाजा बाहेरून त्या व्यक्तीने जोरजोराने ठोठवल्याची घटना घडली. संपूर्ण रात्र जागूनच घाबरलेल्या अवस्थेतच त्या महिलेने काढली. सकाळी तिने ही बाब आपल्या नातेवाईकांना फोनवरून सांगितली. त्यानंतर नातेवाईकांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना ही घटना सांगितल्यानंतर त्या महिलेला दुसऱ्या कक्षात इतर महिलांसोबत राहण्यास पाठवण्यात आले.


दिल्लीत कोरोनाचा आलेख वाढता! एकूण बाधितांचा आकडा १ लाख २५ हजारांवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -